पुण्यात एक खळबळजनक असा प्रकार समोर आलेला असून एका महिलेने मोबाईल ॲपच्या माध्यमातून चार चाकी वाहन बुक केलेले होते मात्र वाहन आल्यानंतर या चालकाने गाडी दुसऱ्याच रस्त्याने घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. पीडित महिलेला हि बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी आरडाओरडा केला आणि त्यानंतर वाहन सिग्नलवर थांबले तेव्हा या महिलेची सुखरूप सुटका करण्यात आली. सदर चालकाच्या विरोधात हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
उपलब्ध माहितीनुसार, योगेश लहानु नवाळे असे आरोपीचे नाव असून त्याच्या विरोधात 44 वर्षीय महिलेने फिर्याद दिलेली आहे. 1 फेब्रुवारी 2022 रोजी ही घटना घडलेली असून महिलेने ऑनलाईन ॲपच्या माध्यमातून चार चाकी वाहन बुक केलेले होते त्यानंतर योगेश हा ते वाहन घेऊन आला. वाहनात फिर्यादी महिला बसल्या आणि त्यानंतर त्यांच्या प्रवासाला सुरुवात झाली .
प्रवास सुरू असताना आरोपी हा आपले वाहन आपल्याला जिथे जायचे आहे तिकडे घेऊन जाता इतरात्र घेऊन जात आहे हे लक्षात आल्यानंतर त्यांनी योगेश याला या संदर्भात विचारणा केली मात्र तरीदेखील त्याने त्यांचे काहीच ऐकून घेतले नाही आणि उलट वाहनाचा स्पीड वाढवला त्यामुळे फिर्यादी यांना त्याच्याबद्दल शंका आली आणि त्यांनी आरडाओरडा सुरू केला. दरम्यानच्या काळात समोर सिग्नल आल्यानंतर गाडी थांबवावी लागली त्यावेळी नागरिकांनी या महिलेची आरोपीच्या तावडीतून सुटका केली.