उत्तर प्रदेश येथे एक महिला रात्रीच्या वेळी नग्न अवस्थेत येऊन घराची बेल वाजवते असा प्रकार समोर आलेला होता पोलिसांनी या प्रकरणी तपासाला सुरुवात केली त्यावेळी ही महिला मानसिकदृष्ट्या आजारी असल्याची माहिती समोर आली आणि लोकांचा जीव भांड्यात पडला. मुंबईतील सांताक्रुज येथे मात्र यापेक्षाही वेगळा प्रकार समोर आलेला असून घर मालकाकडे आलेल्या एका महिला पाहुणीने नग्न अवस्थेत घरात संचार केला आणि त्याचे काही फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले त्यानंतर असभ्य प्रदर्शन केल्याप्रकरणी घरमालक आणि ही महिला यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . मॉडर्न दिसण्याच्या नादात तिने सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या.
उपलब्ध माहितीनुसार, सदर प्रकार जेव्हा सर्वप्रथम समोर आला तेव्हा नागरिकांनी याकडे दुर्लक्ष केले मात्र दुसऱ्यांदा या पाहुणीने असेच कृत्य केले त्यावेळी मात्र वसाहतीत राहत असलेल्या जागरूक नागरिकांना ही बाब खटकली आणि यासंदर्भात त्यांनी पोलिसात माहिती दिली . पुरावे म्हणून या महिलेचे काही फोटो देखील त्यांनी सोशल मीडियावर व्हायरल केलेले असून त्यावर परिसरातील रहिवाशांनी संताप व्यक्त केलेला आहे.