सोशल मीडियावर सध्या एका प्रेमीयुगुलाची जोरदार चर्चा सुरू असून उत्तरप्रदेशातील कानपूर येथील हे प्रकरण असून प्रेमीयुगुल हे मध्य प्रदेशातून पळून गेले होते. गेल्या काही महिन्यांपूर्वी हे प्रेमी पळून गेले होते मात्र त्यानंतर अखेर ते स्वतःच पोलीस ठाण्यात आले आणि त्यांनी आत्मसमर्पण केले. पळून गेलेल्या घटनेला सहा महिने झाले होते. पोलीस त्यांचा शोध घेत होते मात्र अचानकपणे ते पोलीस ठाण्यात प्रकट झाले.
सदर घटना ही मध्यप्रदेशातील असून दहिता नावाची एक तरुणी फारुख नावाच्या मुलाच्या प्रेमात पडलेली होती त्यानंतर त्यांनी लग्न करण्याच्या उद्देशाने घरातून विरोध होत असल्याने पळून जाण्याचा निर्णय घेतला आणि दोघेही आपापल्या घरातून भरभक्कम रक्कम घेऊन फरार झाले .
मुलगी पळून गेल्याचे समजताच तिच्या कुटुंबीयांनी आरोपी फारूक याच्या विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला. पोलीस त्यांचा शोध घेत असताना ते जयपूर येथे असल्याचे आढळून आले मात्र त्यांना देखील या प्रकरणाचा अंदाज आला आणि त्यांनी तिथून कानपूर येथे आपला मुक्काम हलवला. त्यांची परिस्थिती पाहून त्यांना कोणी मदत केली नाही त्यामुळे एका पुलाखाली तीन दिवस ते राहिले आणि अखेर त्यांच्याजवळील पैसे देखील संपून गेले आणि त्यांच्याकडे काहीच मार्ग राहिला नाही त्यानंतर अखेर पोलीस ठाण्यात येऊन त्यांनी झाला प्रकार कथन केलेला असून पोलिसांनी आरोपी तरुणाच्या विरोधात गुन्हा नोंदवलेला आहे .