देशात अनेक धक्कादायक घटना समोर येत असताना अशीच एक घटना बिहार इथे उघडकीस आली आहे. इरफान शेख असे नाव असलेल्या तरुणाने चक्क स्वत:च्याच हाताने आपलं गुप्तांग कापल्याची ही घटना असून सदर तरुणाने दुकानातून ब्लेड खरेदी केलं आणि स्वत:चे गुप्तांग कापून घेतलं.बिहारमधील बेतिया भागातील काला बरवा गावात ही घटना उघडकीस आली आहे. इरफान याला जीएमसीएच रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची तब्येत स्थिर आहे.
उपलब्ध माहितीनुसार, इरफान पोखरामध्ये मजुरीचं काम करत असून तो घरी येणार असल्याचे त्याने वडिलांना फोन करून सांगितले होते मात्र त्याआधीच नेपाळ पोलिसांनी कुटुंबियांना फोन करून मुलगा जखमी असल्याचं सांगितलं आणि वडील त्याला भेटण्यासाठी निघाले. कुटुंबीय रुग्णालयात पोहोचेपर्यंत इरफान तेथून पळून गेला होता मात्र त्याला भारत-नेपाळ सीमेजवळ पकडण्यात आल आणि जीएमसीएचमध्ये दाखल केलं.
वडिलांच्या म्हणण्यानुसार, ‘ इरफानशिवाय त्यांना पाच मुली आहेत मात्र आर्थिक परिस्थिती खराब असल्याने त्यांनी पक्कं घर देखील बांधलेलं नाही त्यामुळे आपण इरफान याचे लग्न देखील करू शकत नव्हतो. सध्या रुग्णालयात इरफानवर उपचार सुरू असून डॉक्टर त्याच्यावर शस्त्रक्रिया करणार आहेत ‘ . इरफान शुद्धीत आल्यावरच त्याने हा प्रकार का केला हे उघडकीस येऊ शकेल असेही वडील म्हणाले.