पुण्यात अनेक व्यक्ती रोजगाराच्या शोधात देखील येतात आणि त्यानंतर नोकरी मिळाल्यावर देखील काही विकृत व्यक्तींकडून त्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. गेल्या काही महिन्यांपासून पुणे शहर महिलांसाठी सुरक्षित आहे का ? असा प्रश्न निर्माण झालेला असून अशीच एक घटना पिंपरी परिसरात समोर आलेली आहे.
पिंपरी परिसरातील एका कार्यालयात एकट्या असलेल्या महिलेला अचानकपणे मिठी मारून तिचा विनयभंग करण्यात आला तसेच माझ्यासोबत जर रिलेशन ठेवले नाही तर तुझ्या चेहऱ्यावर ऍसिड फेकून देईल अशी देखील धमकी या व्यक्तीने तिला दिली. चिखली पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला असून संजय उत्तम राठोड ( राहणार चिखली प्राधिकरण ) असे आरोपीचे नाव असल्याचे समजते.
ऑक्टोबर 2022 पासून आरोपी या महिलेला सतत त्रास देत होता असे त्यांचे म्हणणे असून फिर्यादी यांनी त्याला विरोध केला त्यावेळी त्याने, ‘ जर कोणाला काही सांगितले तर तू कंपनीत फ्रॉड केलेला आहे अशी तुझ्यावर केस दाखल करेल आणि तुला गुन्ह्यात अडकवेल. मला तू तशीही आवडतेस म्हणून माझ्यासोबत जर रिलेशन ठेवले नाही तर मात्र तोंडावर मी ऍसिड फेकेल ‘, अशी देखील त्याने धमकी दिली असे तरुणीने म्हटलेले असून पोलीस उपनिरीक्षक मुळीक याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.