बागेश्वरधाम बनलाय रहस्य ? दोन बेपत्ता एक मयत तर आता अल्पवयीन मुलीचा ..

Spread the love

बागेश्वरधाम येथे धीरेंद्र कृष्ण महाराज पुन्हा एकदा वादात सापडलेला असून या बाबाच्या दरबारात आलेल्या एका दहा वर्षीय मुलीचा वेळेत उपचार न झाल्याने मृत्यू झालेला आहे. राजस्थान येथील बाडमेर येथून या मुलीला बाबाच्या दरबारात मिरगी आजाराच्या उपचारासाठी आणण्यात आलेले होते . धीरेंद्र कृष्ण शास्त्री याने या मुलीवर उपचारासाठी म्हणून विभूती दिली मात्र त्याचा मुलीवर काहीच परिणाम झाला नाही आणि ती शांतपणे बराच काळ पडून होती. बागेश्वरबाबा याने याने तिला दवाखान्यात घेऊन जाण्याचा सल्ला देण्याऐवजी चक्क ही शांत झाली आहे असे तिच्या घरच्यांना सांगितले मात्र काही वेळातच या मुलीचा मृत्यू झाला असल्याचे तिच्या कुटुंबियांच्या लक्षात आले.

अवघ्या आठ दिवसांपूर्वी बागेश्वरबाबा याच्या दरबारात किडनीच्या उपचारासाठी एक महिला आलेली होती तिचा देखील रांगेत उभी असताना कोसळून मृत्यू झालेला होता. कुठल्याही पद्धतीचा वैद्यकीय आधार नसताना अनेक चमत्कार घडवू शकतो असा या बाबाचा दावा आहे. बिहार येथून शिक्षक असलेला ललन कुमार नावाचा व्यक्ती बागेश्वरबाबा इथे आलेला होता तो अद्यापदेखील मिळून आलेला नाही. नीरज मौर्य ही पंचवीस वर्षांची तरुणी 12 फेब्रुवारीला वडील ओमप्रकाश यांच्यासोबत धामला पोहोचली होती त्यानंतर सकाळी १० वाजल्यानंतर ती कुठेच दिसली नाही. नीरज दरबारातून बेपत्ता झाली असल्याचे तिचे वडील सांगत असून त्यांनी लोकांना ती आढळून आली तर मोबाईल नंबर 8955492438 वर किंवा छतरपूर जिल्ह्यातील पोलीस स्टेशनवर माहिती देण्यास सांगितले आहे

बागेश्वरबाबा धीरेंद्र कृष्ण शास्त्री महाराज याने काही दिवसांपूर्वी नागपूर येथे आल्यानंतर दिव्यशक्ती ( दैवीशक्ती नव्हे ) आणि प्रेत दरबार संदर्भात अनेक दावे करत एकच खळबळ उडवून दिली होती. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आव्हान देताच या बाबाने महाराष्ट्रातून पलायन केले मात्र रायपूर येथे जाऊन अंधश्रद्धा निर्मूलन समितीलाच तिथे येण्याचे आव्हान दिलेले होते. बागेश्वरबाबा अर्थात धीरेंद्र कृष्ण शास्त्री महाराज याने याआधी देखील आपण रावणासोबत बोलल्याचा दावा केलेला होता. किडनी उपचारासाठी म्हणून आलेली महिला बाबांच्या रांगेत उभी होती मात्र याचदरम्यान तिचा मृत्यू झाला. भाविकांची गर्दी असताना या बाबाला प्राथमिकता देऊन या महिलेला समजावून का घ्यावेसे वाटले नाही यावर देखील सोशल मीडियात टीका होत असून त्यातच दहा वर्षीय मुलीच्या मृत्यूने बागेश्वरधाम इथे खळबळ उडालेली आहे.


Spread the love