महाराष्ट्रात एक खळबळजनक अशी घटना पुणे जिल्ह्यातील सांगवी परिसरात समोर आलेली असून 25 वर्षीय गतिमंद तरुणीवर एका व्यक्तीने बलात्कार केलेला आहे. तीन वेळा बलात्कार करण्यात आल्यानंतर अखेर तरुणीला दिवस गेले आणि हा धक्कादायक प्रकार उघडकीला आला.
उपलब्ध माहितीनुसार, शिवराज पोपट खरात ( राहणार कांबळेश्वर जिल्हा बारामती ) असे आरोपीचे नाव असून न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावलेली आहे. पीडित मुलगी हिच्या पीडित तरुणीच्या पोटात दुखत असल्याकारणाने तिची आई तिला बारामती येथील महिला रुग्णालयात घेऊन गेलेली होती त्यावेळी ही मुलगी 19 आठवड्यांची गरोदर असल्याची देखील माहिती समोर आली. आईने मुलीला विश्वासात घेतले त्यावेळी तिने शिवराज याचे नाव घेतले आणि तीन वेळा त्याने आपल्यासोबत हा प्रकार केलेला आहे असे देखील तिने सांगितले त्यानंतर त्यांनी पोलिसात धाव घेतली.