पुणे शहरात एक धक्कादायक घटना समोर आलेली असून चक्क कौटुंबिक न्यायालयात समुपदेशन कारण्यासाठी पती पत्नी समोर आलेले असताना पतीने हल्ला करत पत्नीचा दात पडला आहे . पत्नीने घटस्फोट देण्यास नकार दिल्याने कौटुंबिक न्यायालयातच पतीने पत्नीचा बुक्की मारून दात पाडला. दात पाडणाऱ्या या पतीविरूद्ध शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उपलब्ध माहितीनुसार, सचिन विकास पवार (वय 34 लोहगाव रोड, विमानतळ) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. ही घटना शिवाजीनगरच्या कौटुंबिक न्यायालयातील दुस-या मजल्यावरील समुपदेशन केंद्राच्या बाहेर 27 नोव्हेंबर रोजी घडली असून सोलापूर येथे राहाणा-या पत्नीने पतीच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हे पती-पत्नी असून सध्या ते दोघेही विभक्त राहात आहेत. घटस्फोटासाठी अर्ज केल्यानंतर प्राथमिक समुपदेशनासाठी ते दोघेही कौटुंबिक न्यायालयात आले होते. समुपदेशन केंद्रात पतीने पत्नीला घटस्फोट देण्यासंदर्भात विचारणा केली असताना तिने नकार देताच पतीचा संताप अनावर झाला आणि रागाच्या भरात आरोपीने फिर्यादीच्या तोंडावर जोरदार बुक्की मारली. अचानक झालेल्या हा हल्ल्याने बेसावध पत्नीचा एक दातच पडला त्यानंतर पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून पतीविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.