‘ बोल हॅप्पी ऍनिव्हर्सरी.. ‘ , बायकोसोबत माहेरच्यांनी पतीला बदडलं

Spread the love

सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा काही नेम राहिलेला नाही असाच एक प्रकार मुंबईत समोर आलेला असून आपल्या पत्नीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या नाही म्हणून महिलेच्या पतीलाच माहेरच्या व्यक्तींनी बेदम मारहाण केलेली आहे. घाटकोपरमध्ये हा प्रकार घडलेला असून मारहाणीतून वाचण्यासाठी हतबल झालेल्या पतीने अखेर पोलिसात धाव घेतलेली आहे. पत्नी आणि तिच्या माहेरच्या व्यक्तींच्या विरोधात यानंतर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार, तक्रारदार व्यक्ती हे 33 वर्षीय असून गोवंडी परिसरात राहायला आहे तर त्यांची पत्नी एका खाजगी कंपनीत नोकरी करते. 2018 मध्ये त्यांचा विवाह झालेला असून 18 फेब्रुवारी रोजी त्यांचा लग्नाचा वाढदिवस होता मात्र तिच्या पतीने तिला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या नाही म्हणून त्यांच्यामध्ये भांडण झाले आणि त्यानंतर ती रागात कामावर निघून गेली. 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंतीची सुट्टी असल्याकारणाने तक्रारदार हे घरीच होते त्यावेळी पत्नी घरी आली आणि त्यांना घराची चावी मागितली तसेच तुमच्यासोबत राहायचे नाही असे देखील त्यांना सांगण्यात आले.

आपली पत्नी अशी काय बोलते आहे हे लक्षात आल्यावर काय बोलावे हेच पतीला समजेना त्यानंतर पत्नीने तिच्या आई आणि भावाला देखील तिथे बोलावून घेतले आणि ‘ लग्नाच्या वाढदिवसाला तू तिला शुभेच्छा का दिल्या नाहीस ‘ असे म्हणत तक्रारदार पतीला बेदम मारहाण सुरू केली. तक्रारदार व्यक्तीच्या आईने समजावण्याचा प्रयत्न केला मात्र आरोपींनी त्यांना देखील मारहाण केली असे पीडित पतीचे म्हणणे असून बेदम मारहाण झाल्यावर त्यांनी पोलिसात धाव घेतली आहे.


Spread the love