महाराष्ट्रात एक खळबळजनक अशी घटना लातूर परिसरात समोर आलेली असून 15 फेब्रुवारी रोजी व्हॅलेंटाईनच्या दुसऱ्या दिवशी शाळेत जाते म्हणून घराबाहेर पडलेल्या मुलीचा एका मुलासोबत विहिरीत मृतदेह आढळून आलेला आहे. लातूर जिल्ह्यातील चिंचोली बल्लाळनाथ येथील एका विहिरीत दोन्ही जणांचा मृतदेह आढळून आलेला आहे.
उपलब्ध माहितीनुसार, मुलीचे वर्ष वय सोळा वर्षे असून तिच्यासोबत असलेल्या मुलाचे वय 17 वर्षे आहे. वसवाडी परिसरातील मुलगी रहिवासी असून 15 फेब्रुवारी रोजी ती शाळेत जाण्यासाठी निघालेली होती शाळेतून परत आली नाही म्हणून कुटुंबीयांनी तिचा शोध सुरू केला. लातूर एमआयडीसी पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार देखील नोंदवण्यात आली आणि पोलिसांनी तपासाला सुरुवात केलेली होती.
चिंचोली बल्लाळनाथ तालुका लातूर येथील एका शेतकऱ्याच्या शेतातील विहिरीत या मुलीचा मृतदेह आढळून आला होता शिवाय विहिरीच्या काठावर एका मुलाची चप्पल देखील आढळून आल्याने पोलिसांनी प्रेमप्रकरणाचा अँगल लक्षात घेऊन मृतदेहाचा शोध सुरू केला आणि त्यानंतर दोनही जणांचे मृतदेह या विहिरीत आढळून आलेले आहेत. दोघांनी एकाच वेळी विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलेला असून 14 फेब्रुवारीचा व्हॅलेंटाईन हा त्यांच्या आयुष्यातला शेवटचा व्हॅलेंटाईन ठरलेला आहे