अनैतिक संबंधातून गर्भधारणा ? बाळ विक्रीच्या रॅकेटचा पर्दाफाश

Spread the love

अनेक दाम्पत्यांना मूल होत नसल्यामुळे ते चिंतेत असतात. काहीही करून आपल्या घरात लहान बाळ असावे अशी त्यांची इच्छा असते त्यातून अर्भक चोरी असे प्रकार देखील होत असून नागपूरच्या कोराडी येथे असाच एक प्रकार समोर आलेला आहे. सदर प्रकरणी चक्क डॉक्टर यांचा देखील सहभाग आढळून आलेला असून पोलिसांनी कारवाईला सुरुवात केलेली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, कोराडी परिसरात राहणाऱ्या एका महिलेच्या पतीचा खून झालेला होता त्यानंतर ती एकटी राहत असताना तिचा नातेवाईक असलेला एक व्यक्ती तिला भेटायला म्हणून यायचा. त्याची पत्नी देखील प्रियकरासोबत पळून गेलेली असल्याने तो देखील एकटा पडलेला होता त्यातून त्यांचे प्रेम संबंध जुळले आणि त्यांनी शारीरिक संबंध ठेवण्यास सुरुवात केली त्यातून ही महिला गर्भवती झालेली होती. विवाह झाला नसल्याकारणाने आता या होणाऱ्या बाळाचे करायचे काय असा तिला प्रश्न होता.

सप्टेंबर 2021 मध्ये सदर प्रकरणातील आरोपी असलेला डॉक्टर नितेश मौर्य ( वय 37 मनीष नगर सोमल वाडा ) याच्या रुग्णालयात ती गेलेली होती तेव्हा तिथे परिचारिका म्हणून काम करणारी रेखा पुजारी हिने तिला विश्वासात घेतले आणि त्यानंतर तुला बाळ झाल्यानंतर आम्ही तुझे बाळ विकून देऊ असे सांगत बाळ विक्री करणाऱ्या टोळीची प्रमुख श्वेता सावळे उर्फ आयेशा खान हिच्याकडे तिला पाठवले. आयेशा हिचा पती मकबूल खान, दलाल सचिन रमेश पाटील यांनी सुनेसाठी आम्हाला बाळ दत्तक घ्यायचे आहे असे सांगत गर्भपात न करता तुम्ही या मुलाला जन्म दे, आम्ही तुझे बाळ विकत घेऊ असे सांगितले अखेर या महिलेची डिलिव्हरी झाली त्यानंतर या बाळाला दोन दिवसांच्या बाळाला परप्रांतात पाच लाख रुपयांना विकले होते.

सदर प्रकरणी गुन्हे शाखेच्या मानवी तस्करी विरोधी पथकाच्या प्रमुख असलेल्या रेखा संकपाळ यांना या संदर्भात माहिती हाती लागली अन तपासाला सुरुवात झाली त्यावेळी आयेशा खान हिच्या टोळीने या बाळाची विक्री केल्याचे लक्षात आले. रेखा संकपाळ यांनी तात्काळ डॉक्टर सुनील मौर्य आणि रेखा पुजारी यांची चौकशी केली त्यावेळी रेखा हिने हे बाळ आपण आयेशा हिच्या ताब्यात दिलेले होते असे सांगितलेले आहे. सदर टोळीने याआधी देखील असाच प्रकार केलेला आहे का याच्या देखील तपासाला सुरुवात झालेली असून विवाहबाह्य संबंध प्रेम प्रकरणातून गर्भधारणा झाल्याने या टोळक्याने इतरही अनेक जणांना अशाच पद्धतीने बाळांची विक्री केली आहे का ? याचा तपास सुरू करण्यात आलेला आहे .


Spread the love