शेवटचा पर्याय म्हणून बायकोचे दागिने मोडले पण तरीही..

Spread the love

एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटलेला असला तरी कर्मचाऱ्यांसमोर आर्थिक अडचणी मोठ्या प्रमाणात उभ्या राहिलेल्या आहेत.संपाच्या काळात उसनवारी करून कुटुंब चालवले मात्र आत्ता देखील पगार वेळेवर होत नसल्याने सांगली जिल्ह्यातील कवठे महाकाळ येथील एसटी आगारात कार्यरत असलेले असलेल्या एका बसचालकाने शिरढोण इथे राहत्या घरी गळफास घेतलेला आहे . गुरुवारी सकाळी ही घटना उघडकीला आलेली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, भीमराव रावसाहेब सूर्यवंशी ( वय 50 राहणार शिरढोण तालुका कवठेमहाकाळ ) असे मयत व्यक्ती यांचे नाव असून गेल्या दोन वर्षांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे प्रमाण नियमित पगार नियमितपणे होत नसल्याने आर्थिक अडचणीपुढे ते हतबल झालेले होते. गेल्या 20 ते 25 वर्षापासून ते कवठेमहाकाळ बसआगारात वाहन चालक म्हणून काम करायचे. संपाच्या काळात आर्थिक अडचणी निर्माण झाल्याने संसाराचा गाडा कसाबसा त्यांनी हाकला मात्र तरीदेखील त्यानंतर पगारही वेळेवर होत नसल्याने ते हतबल झालेले होते.

काही दिवसांपूर्वी शेवटचा पर्याय म्हणून त्यांनी पत्नीचे सोन्याचे दागिने मोडले आणि गावातील काही व्यक्तींचे राहिलेले पैसे त्यांनी त्यातून देऊन टाकले होते मात्र तरी देखील आर्थिक अडचण ससेमीरा सोडण्यास तयार नव्हती. जानेवारी महिन्याचा पगार खात्यात जमा होईल अशी त्यांना अपेक्षा होती मात्र 15 फेब्रुवारी उजाडली तरी देखील पगार खात्यात आला नाही त्यामुळे ते हैराण झालेले होते. बुधवारी रात्री घरातील सर्वजण झोपल्यानंतर त्यांनी स्वयंपाक घरात जाऊन गळफास घेतला आणि दुसऱ्या दिवशी गुरुवारी हा प्रकार कुटुंबीयांच्या निदर्शनास आला.


Spread the love