महाराष्ट्रात अनेक ठिकाणी लग्नाळू तरुणांना मुली मिळत नसल्याचे चित्र आहे त्यातून मॅरेज रॅकेट नावाचा नवीन गुन्हेगारी प्रकार सध्या सुरू झालेला आहे असाच एक प्रकार औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर परिसरात उघडकीला आलेला असून लग्न केल्यानंतर हळदीच्या अंगानेच नवरीने दागदागिने घेऊन पलायन केलेले आहे. सदर प्रकरणी वरपित्याला तब्बल पावणेदोन लाखांचा चुना लागलेला असून गंगापूर पोलीस ठाण्यात नवरीसोबत सात जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
उपलब्ध माहितीनुसार, मालुन्जा खुर्द तालुका गंगापूर येथील हे प्रकरण असून एक वरपिता आपल्या मुलासाठी मुलीच्या शोधात होता त्यावेळी तालुक्यातील वैजापूर तालुक्यातील नागमठाण येथील रहिवासी असलेला जनार्दन कारभारी पेठे त्याला याप्रकरणी माहिती कळाली आणि त्याने वरपित्याशी संपर्क साधला . पीडित तरुणाचे वडील तरुण आणि पेठे हे सर्व मुलगी पाहण्यासाठी रांजणगाव शेणपुंजी येथे गेलेले होते त्यावेळी शिंदे नावाच्या एका व्यक्तीने दिशा कदम ही मुलगी दाखवली त्यावेळी तिथे गणेश पवार, सुरज शिंदे आदी व्यक्ती देखील उपस्थित होते. मुलाला ही मुलगी पसंत पडली आणि त्यानंतर लग्नाच्या तयारीला सुरुवात झाली.
लग्न जमल्यानंतर तात्काळ वर पित्याच्या फसवणुकीला सुरुवात झाली त्यानंतर नवऱ्या मुलीची मावशी आजारी आहे तिला उपचारासाठी पन्नास हजार रुपयांची गरज आहे असे करून हळूहळू करत या टोळक्याने 90 हजार रुपये स्वतःच्या पदरात पाडून घेतले त्यानंतर 12 डिसेंबर २०२२ रोजी एका मंदिरात मोजक्या लोकांच्यासोबत हा विवाह पार पडला त्यावेळी मुलीला सुमारे 40 हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने घालण्यात आले त्यानंतर लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी मुलीच्या मावशीची तब्येत पुन्हा बिघडली म्हणून तिला परत पन्नास हजार रुपये देण्यात आले.
18 डिसेंबर रोजी मुलाच्या घरी सत्यनारायणाचा कार्यक्रम झाल्यावर रात्रीचे जेवण झाले आणि त्यानंतर सर्वजण झोपी गेले त्यावेळी नवरी हिने बाथरूमला जाते असे सांगत घराबाहेर पडली ती पुन्हा आलीच नाही. तिच्या पतीने तिचा शोध घेतला त्यावेळी एका व्यक्तीने रस्त्यावर एक दुचाकीस्वार तिची वाट पाहत होता त्याच्यासोबत तिने पळ काढला अशी माहिती त्याला समजली त्यांचा सर्वत्र शोध घेण्यात आला मात्र ते आढळून आले नाहीत .
हतबल झालेले वर पिता यांनी अखेर गंगापूर पोलीस ठाण्यात जनार्दन कारभारी पेठे , नवरी दिशा माधव कदम ( राहणार रांजणगाव शेणपुंजी ) नातेवाईक विकास बापू शिंदे ( राहणार वडगाव कोल्हाटी), गणेश रमेश पवार ( राहणार देवगिरी कॉलनी करोडी ) सुरज साहेबराव शिंदे राहणार ( वडगाव कोल्हाटी ) आणि इतर दोन अनोळखी महिलांच्या विरोधात गुन्हा नोंदवलेला असून नववधू आणि तिच्यासोबत असलेले आरोपी यांचा पोलीस शोध घेत आहेत.