पुण्यात एक खळबळजनक असा प्रकार समोर आलेला असून धनकवडी येथे लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणीवर वारंवार अत्याचार करणाऱ्या आणि त्यानंतर ती गर्भवती झाल्यानंतर तिचा गर्भपात घडवून आणणाऱ्या डॉक्टरच्या विरोधात भारती विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे. संबंधित आरोपी डॉक्टरने या तरुणीकडून मोबाईल आणि सुमारे 60 हजार रुपये देखील उकळले असे देखील तिचे म्हणणे आहे.
उपलब्ध माहितीनुसार, डॉक्टर अंकुश गुंड ( राहणार गणेश विला आंबेगाव ) असे आरोपी डॉक्टरचे नाव असून त्याच्या विरोधात २६ वर्षीय तरुणीने भारती विद्यापीठ पोलिसात तक्रार दिलेली असून आरोपीने आपल्यासोबत हा प्रकार सप्टेंबर 2022 पासून तर फेब्रुवारी 2023 पर्यंत म्हणजे सुमारे दीड वर्ष लग्नाचे आमिष दाखवत आपल्यासोबत वारंवार अत्याचार केले असे म्हटलेले आहे.
तरुणीने म्हटल्याप्रमाणे तिचे वडील आजारी असताना ती रिपोर्ट दाखवण्यासाठी डॉक्टरांकडे गेली होती आणि त्यातून त्यांची ओळख झाली आणि त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. काही दिवसात या प्रेमसंबंधाचे शारीरिक संबंधात रूपांतर झाले आणि त्यातून पुढे ही तरुणी गर्भवती झाली. गर्भवती असताना आरोपी डॉक्टरने तिला गोळ्या खाऊ घातल्या आणि तिचा गर्भपात देखील केला. तिचा मोबाईल आणि साठ हजार रुपये घेऊन डॉक्टरांनी आपली फसवणूक केलेली आहे असे तिने म्हटलेले असून पोलीस प्रकरणाचा तपास करत आहेत.