पुणे जिल्ह्यात उपसरपंच महिलेच्या पतीला चपलांनी धुतले कारण..

Spread the love

चित्र : सांकेतिक

पुणे जिल्ह्यात सध्या एक खळबळजनक असे प्रकरण इंदापूर तालुक्यात समोर आलेले असून तालुक्यातील एका ग्रामपंचायतीच्या पायरीवर एका शिपायाला उपसरपंचाच्या पतीने बसवलेले होते त्यावेळी महिला सरपंच असलेल्या व्यक्तीने या प्रकरणी विचारणा केली म्हणून उपसरपंचाच्या पतीने या महिला सरपंचाला शिवीगाळ केली आणि तिच्या हाताला धरून लज्जास्पद वर्तन केले त्यानंतर मात्र या उपसरपंचाच्या पतीला चपलेने मारहाण करण्यात आलेली आहे.

सदर प्रकरणी उपसरपंच असलेल्या महिलेच्या पतीवर पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला असून महिला सरपंच यांनी त्याच्या विरोधात फिर्याद दिली होती. 24 फेब्रुवारी रोजी हे प्रकरण घडलेले असून ग्रामपंचायतीचे कर्मचारी अनिल भोई हे ग्रामपंचायतीच्या पायरीवर बसलेले होते. महिला सरपंच यांनी त्यांना या संदर्भात कारण विचारले तेव्हा आपल्याला इथे उपसरपंचाच्या पतीने बसवलेले आहे असे त्यांनी सांगितले त्यावरून उपसरपंच असलेल्या महिलेच्या पतीचा आणि महिला सरपंच यांचा वाद झाला त्यावेळी या पतीने चक्क महिला सरपंच यांच्या हाताला धरून शिवीगाळ करत त्यांच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे शब्दप्रयोग वापरले.

सदर ठिकाणी इतरही नागरिक उपस्थित होते त्यानंतर त्यांचा देखील संताप अनावर झाला आणि या उपसरपंच असलेल्या महिलेच्या पतीला संतप्त नागरिकांनी मारहाण केली. आरोपीने चक्क महिला सरपंच यांचा हात पकडला आणि त्यांना अश्लील शिवीगाळ केली म्हणून संतप्त नागरिकांनी हा त्याला चपलेचा प्रसाद दिला अशी चर्चा असून सदर घटनेचा तपास भिगवनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार करत असल्याची माहिती आहे.


Spread the love