महाराष्ट्रात एक संतापजनक अशी घटना जालना जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी उघडकीस आली होती. जालना जिल्ह्यात मंठा तालुक्यातील बेलोरा येथील दीप्ती ऊर्फ सपना संदीप जाधव (वय १७) हिचा खून करण्यापूर्वी संशयित सुशील पवार याने मोबाईल गिफ्ट दिला होता आणि त्यानंतर त्याने तिला लग्नाआधी ‘ शारिरीक संबंध ‘ ठेवण्याची मागणी केली मात्र तिने नकार दिल्यावर चारित्र्यावर संशय घेऊन त्याने तिचा खून केला आणि नंतर गुजरात इथे पलायन केले होते मात्र काम न मिळाल्याने तो मुंबईकडे आला आणि पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. विशेष म्हणजे अवघा एक महिना लग्नाला बाकी असताना ही घटना घडलेली होती.
जालना जिल्ह्यातील बेलोरा गावातील दीप्ती ऊर्फ सपना संदीप जाधव (१७) हिचा बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील वरुड येथील सुशील पवार या तरुणासोबत विवाह जुळला होता आणि त्यांचा साखरपुडाही झाला होता. विवाह १७ मार्च रोजी असल्याने १८ फेब्रुवारी रोजी वधू आणि वर पक्षांकडील मंडळी लग्नाचा बस्ता बांधण्यासाठी गेलेली असल्याने सपना ही घरी एकटीच होती म्हणून संधी साधून सुशीलने नातेवाईकांना खोटे सांगून थेट बेलोरा गाव गाठले आणि तिला मोबाईल भेट दिला सोबतच तिच्यासोबत त्याने ‘ शारिरीक संबध ‘ ठेवण्यासाठी जबरदस्ती केली.
तिने नकार दिल्यावरही त्याने तिच्यावर अत्याचार केला आणि नंतर चारित्र्याच्या संशयावरून त्यांच्यात वादावादी झाली त्यावेळी त्याने तिच्या छातीवर बसून तिचा धारदार शस्त्राने गळा चिरला त्यामुळे तिचा मृत्यू झाला. तिचा खून केल्यावर पळून जाताना त्याची दुचाकी पिठाच्या गिरणीला धडकली म्हणून नागरिकांना त्याचा चेहरा लक्षात होता. खून केल्यावर त्याने गुजरातला पलायन केले मात्र काम न मिळाल्याने तो मुंबईत आला अन पोलिसांनी त्याला अटक केली. त्याने सपनाने आत्महत्या केल्याचे सांगितले मात्र पोलिस खाक्या दाखविताच त्याने खून केल्याची कबुली दिली असून त्याला २८ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.