पुण्यात एक खळबळजनक असे प्रकरण समोर आलेले असून आपण अँटी करप्शनचे पोलीस आणि न्यूज रिपोर्टर असल्याचे सांगत स्पेशल छब्बीस चित्रपटाप्रमाणे एका महिलेच्या घरावर दहा जणांच्या टोळक्याने छापा टाकलेला होता. सदर महिला ही वेश्याव्यवसाय करत असल्याचा गुन्हा दाखल करण्याची भीती दाखवत आरोपींनी महिलेला लुबाडले.
उपलब्ध माहितीनुसार, पीडित महिलेचे वय 40 वर्ष असून त्यानंतर हा प्रकार समोर आल्यावर सदर प्रकरणातील आरोपी सीमा शशिकांत शिंदे ( वय 30 राहणार अप्पर इंदिरानगर ), रमेश कंक ( वय 45 राहणार नऱ्हे ), कार्तिक कांबळे ( वय 20 राहणार कात्रज ), स्वप्निल कांबळे ( वय 21 राहणार आंबेगाव ) अशी आरोपींची नावे असून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलेले आहे.
पीडित महिलेच्या घरी रात्रीच्या वेळी काहीजण आले त्यावेळी त्यांनी आम्ही अँटी करप्शन ब्युरो आणि न्यूज रिपोर्टर आहोत असे सांगितले त्यानंतर महिलेच्या मुलांना आणि भाचीला मारहाण केली. तुम्ही येथे वेश्या व्यवसाय करत असत असून तुमच्यावर केस दाखल करतो अशी देखील त्यांनी धमकी दिली आणि प्रकरण मिटवण्याकरता 14 हजार रुपये रक्कम आणि 70 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने असा ऐवज घेऊन त्यांनी पलायन केले.
सदर प्रकार सुरू असताना त्यांच्या ओळखीची असलेली सीमा शिंदे ही बाहेर उभी होती हे फिर्यादी यांच्या मुलाने पाहिले त्यामुळे तिनेच हा प्रकार केला असावा अशी त्यांना शंका आली त्यानंतर तपासात सहकाऱ्यांच्या मदतीने तिनेच हा प्रकार घडवून आणण्याचे समोर आलेले आहे .