पुण्यात एक खळबळजनक असे प्रकरण समोर आलेले असून शिक्षण विभागात प्रशासन अधिकारी असल्याचे सांगत तब्बल 45 जणांना पाच कोटी रुपयांना गंडा घालण्यात आलेला आहे. सदर प्रकरणात शैलजा दराडे यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला असून सध्या त्या राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त आहेत.
उपलब्ध माहितीनुसार, सांगली जिल्ह्यातील एका पन्नास वर्षीय शिक्षकाने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिलेली असून पोलिसांनी दादासाहेब रामचंद्र दराडे ( राहणार अकोले तालुका इंदापूर ) आणि शैलजा रामचंद्र दराडे ( राहणार पाषाण ) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे. शैलजा या दादासाहेब दराडे याच्या बहिण आहेत.
सदर प्रकरणातील आरोपी दादासाहेब याने शिक्षण विभागात प्रशासन अधिकारी आपल्या परिचयाचे आहेत असे सांगत दोन बहिणींना शिक्षक पदावर लावण्याची लालूच दाखवलेली होती आणि त्यांच्याकडून 2019 मध्ये 27 लाख रुपये घेतले तर अशाच पद्धतीने इतर 44 जणांना देखील फसवण्यात आलेले असल्याची माहिती समोर आलेली आहे . शैलजा दराडे यांनी काही दिवसांपूर्वी सुमारे दोन वर्षांपूर्वी पेपरला जाहीर नोटीस देऊन दादासाहेब हे आपले भाऊ आहेत मात्र त्यामुळे भाऊ या नात्याने त्यांच्यासोबत कोणी व्यवहार करू नये अशी नोटीसही दिलेली होती अशीही माहिती समोर आलेली आहे .