लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणारी प्रेयसी मृत अवस्थेत आढळल्याने परिसरात खळबळ

Spread the love

देशात अनेक धक्कादायक घटना समोर येत असताना अशीच एक घटना बिहार इथे उघडकीस आली आहे . प्रियकरासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या तरुणीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडालेली आहे. बिहारमधील जमुई जिल्ह्यात ही घटना उघडकीस आली असून गुडिया बेसरा असे तरुणीचे नाव असून तिचे वय २२ वर्षे इतके आहे . झारखंडमधील गिरिडीह जिल्ह्यातील भेलवाघाटी येथील रहिवासी होती. तिच्या घरच्या लोकांनी तिच्या प्रियकरावर खून केल्याचा आरोप केला असून तपास सुरु असल्याचे समजते .

मिळालेल्या माहितीनुसार, गुडियाचे बबलू तुड्डू नावाच्या तरुणासोबत गेल्या अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध होते आणि ती त्याच्यासोबत गेल्या चार वर्षांपासून राहत होती . लग्नासाठी घरचे तिला सांगत होते मात्र ती टाळाटाळ करत होती. तीन महिन्यांपूर्वी बबलू तुड्डूने मोटारसायकल घेण्यासाठी तिच्या घरच्यांना पैसे मागितले होते त्यावर तुझे लग्नच झाले नाही तर पैसे का द्यायचे असे गुडियाच्या कुटुंबीयांनी त्याला ठणकावले होते आणि त्यानंतर सकाळी गुडियाने आत्महत्या केल्याची माहिती मिळाली. मुलीच्या वडिलांनी हा खून असल्याचा आरोप केलेला आहे .

वडिलांच्या म्हणण्यानुसार, माझ्या मुलीचे आणि बबलू तुड्डूचे गेल्या अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध होते, त्यामुळे दोघेही एकत्र राहण्यास तयार झाले. आमच्या कुटुंबातील आणि समाजातील लोकांनी दोघांना लग्न करण्यास सांगितले. मात्र, त्यांनी त्यास नकार दिला.

चंद्रमंडीह पोलीस ठाण्याचे अध्यक्ष ब्रजभूषण सिंह यांनी सांगितले की, मुलीच्या कुटुंबीयांनी तिचा प्रियकर बबलू तुड्डू याच्यावर हत्येचा आरोप करत तक्रार केली आहे. पोलिस खून आणि आत्महत्या या दोन्ही प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास करत आहेत. फरार आरोपींना पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. पोस्टमॉर्टम अहवाल आल्यानंतरच काय ते स्पष्ट होणार आहे .


Spread the love