काही दिवसांपूर्वी मुंबई येथे एक खळबळजनक घटना समोर आलेली होती. एका व्यावसायिकाची लूट केल्याचे हे प्रकरण होते मात्र या प्रकरणात तपासांती जे काही समोर आले ते पाहून पोलीसही चकित झालेले आहेत. पैशाची उधळपट्टी करणाऱ्या एका पत्नीला धडा शिकवण्यासाठी आणि सासूने घरासाठी दिलेले 44 लाख रुपये लाटण्यासाठी लोखंडवाला परिसरात राहत असलेल्या व्यावसायिकाने हा लुटीचा बनाव केलेला होता. आगरी पाडा पोलिसांनी सदर प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावलेला आहे
उपलब्ध माहितीनुसार, अमीत वोरा ( वय 30 ) असे या प्रकरणातील व्यक्तीचे नाव असून अंधेरी लोखंडवाला येथील एका ठिकाणी तो कुटुंबीयांसोबत राहतो. गुरुवारी पोलीस ठाण्यात त्याने दिलेल्या तक्रारीनुसार काही व्यक्तींनी आपण पोलीस असल्याची बतावणी करत 44 लाख रुपये पळवून नेण्याचा प्रकार घडल्याची माहिती पोलिसात दिलेली होती त्यानंतर पोलिसांनी अज्ञात चार व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आणि तपासाला सुरुवात केली.
पोलीस तपास सुरू असताना व्यवसायिकाने दिलेली माहिती आणि घटनास्थळावरील परिस्थिती यात तफावत समोर आली त्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडे उलट तपासणी केली त्यावेळी त्याने पोलिसांपुढे आपली व्यथा मांडली. आपली पत्नी ही सतत पैशाची उधळपट्टी करते. सासूने घरासाठी दिलेले 44 लाख रुपये देखील ती शॉपिंगमध्ये उडून टाकील याची आपल्याला भीती होती म्हणून चोरी झाल्याचा बनाव रचला. पैशाची खरी किंमत तिला देखील कळेल म्हणून आपण लुटीची खोटी माहिती दिली असे त्यांनी सांगितले. पोलिसांनी ही रक्कम त्याच्या मालाड येथील घरातून जप्त केलेले असून त्याला देखील ताब्यात घेण्यात आलेले आहे.