तिच्यासोबत तिच्या नवऱ्यालाही राणीनं सोडलं नाही अन अखेर ..

Spread the love

देशात एक खळबळजनक असे प्रकरण बिहारमध्ये समोर आलेले असून समलैंगिक संबंधात अडचण ठरणाऱ्या पतीची पत्नीने हत्या केल्यानंतर परिसरात खळबळ उडालेली आहे. पाटणाजवळ दानापूर येथे ही घटना उघडकीला आलेले असून पाच जणांना पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत.

उपलब्ध माहितीनुसार,पवनराम आणि निशू हे पती-पत्नी असून पवनराम याची हत्या झाल्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली त्यावेळी मयत व्यक्तीचा मोबाईल हा या प्रकरणातील राणी नावाच्या एका महिलेकडे आढळून आलेला होता. पोलिसांनी तिच्या तपासाला सुरुवात केली त्यावेळी तिने आपली आणि निषु यांची भेट एक वर्षांपूर्वी झाली होती आणि आम्हाला सोबत राहायचे होते. आपण निशू हिच्या घरी वेळोवेळी जात होतो त्यावेळी पवन आणि आपली देखील ओळख झाली आणि आमच्यात देखील अनेकदा शारीरिक संबंध प्रस्थापित झालेले होते असे सांगितलेले आहे.

दुसरीकडे पवनराम याची पत्नी ही देखील आपली चांगली मैत्रीण असून तिच्यासोबत देखील आपण अनेकदा शारीरिक संबंध प्रस्थापित केलेले आहेत या प्रकाराची माहिती आपण पवन याला दिली मात्र त्याला हा प्रकार आवडला नाही आणि त्याने वारंवार निषु हिला माझ्यापासून लांब राहण्याचे सांगितले त्यामुळे अखेर निषु आणि मी दोघींनी मिळून त्याची सुपारी देऊन त्याची हत्या केली अशी कबुली दिलेली असून पोलिसांनी दोन महिला आणि तीन पुरुषांना या प्रकरणात अटक केलेली आहे .


Spread the love