सोशल मीडियावर सध्या एका खळबळजनक प्रकाराची जोरदार चर्चा सुरू असून मुंबई येथील हे प्रकरण आहे. एका व्यक्तीचे युट्युबवर चक्क न्यूड व्हिडिओ अपलोड करण्यात आले आणि जर तुम्हाला हे व्हिडिओ हटवायचे असतील तर आम्हाला तीन लाख रुपये द्यावे लागतील असे सांगून एका हॉटेल कर्मचाऱ्याकडून तब्बल तीन लाख रुपयांची खंडणी उकळण्यात आली तरीदेखील समोरील व्यक्तीचे समाधान झाले नसल्याकारणाने अखेर हतबल झालेल्या या व्यक्तीने पोलिसात धाव घेतली.
तक्रारदार व्यक्ती हे अंधेरी पूर्व येथील रहिवासी असून एका हॉटेलमध्ये कामाला आहेत. 23 फेब्रुवारी रोजी रात्री पावणे बाराच्या सुमारास एका मोबाईल नंबर वरून त्यांना व्हाट्सअँपवर अनोळखी कॉल आला होता. कॉल उचलल्यानंतर समोर एक तरुणी त्यांना नग्न अवस्थेत दिसून आली त्यामुळे त्यांनी कॉल कट करण्याऐवजी सुरू ठेवला मात्र सदर तरुणीने तिचा चेहरा लपवलेला असल्याकारणाने तिचा चेहरा त्यांना दिसून आला नाही त्यानंतर त्यांनी तो कॉल कट केला.
त्यानंतर समोरच्या नंबर वरून अनेकदा व्हाट्सअप कॉल आले त्यावेळी समोरील व्यक्तीने त्यांना तुमचे काही न्यूड व्हिडिओ सोशल मीडियावर अनोळखी युट्युबवर अनोळखी व्यक्तीने टाकलेले आहेत ते तुम्हाला डिलीट करायचे असतील तर या नंबरवर फोन करा असे सांगितले. तक्रारदार व्यक्ती यांनी त्या नंबरवर फोन केला त्यावेळी त्यांना वेळोवेळी करत आत्तापर्यंत तीन लाख सहा हजार रुपयांना फसवण्यात आलेले आहे. तक्रारदार यांनी अखेर अंधेरी पोलिसात धाव घेत तक्रार नोंदवली असून पोलिसांनी प्रकरणाच्या तपासाला सुरुवात केलेली आहे