पुण्यात मॅरेज रॅकेट ? पुरंदरची दीपाली पसंत पडली अन..

Spread the love

bride

ग्रामीण पातळीवर अनेक तरुणांना सध्या लग्नासाठी मुली मिळत असल्याकारणाने या क्षेत्रात मॅरेज रॅकेट नावाचा गुन्हेगारी प्रकार सुरू झालेला आहे अशा स्वरूपाची आणखीन एक घटना कोल्हापूर परिसरातील शिरोळ येथे उघडलेला आलेली असून एका तरुणाची लग्नाच्या बहाण्याने तब्बल एक लाख 70 हजार रुपयांना फसवणूक करण्यात आलेली आहे. चार जणांच्या विरोधात शिरोळ पोलीस ठाण्यात यानंतर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे

उपलब्ध माहितीनुसार, महादेवी सदाशिव कुकुटनुर ( राहणार नांद्रे तालुका मिरज जिल्हा सांगली ), संजय शिवाजी मंडले ( राहणार माळवाडी तालुका मिरज ) ज्योती धनंजय लोंढे ( राहणार वाघोली पुणे ) आणि दिपाली विलास बडदे ( तालुका पुरंदर जिल्हा पुणे ) अशी या प्रकरणातील संशयित आरोपींची नावे आहेत.

तक्रारदार असलेल्या व्यक्तीला दिपाली हिला लग्नासाठी मुलगी म्हणून दाखवलेले होते त्यानंतर तक्रारदार यांना दिपाली पसंत पडल्यानंतर इतर आरोपींनी तक्रारदार यांच्याकडून वेळोवेळी गुगल पे आणि फोन पेच्या माध्यमातून एक लाख 70 हजार रुपये घेतले आणि त्यानंतर तक्रारदार व्यक्ती यांचा विवाह 24 ऑगस्ट 2022 रोजी दीपालीसोबत लावून दिला या विवाहाची त्यांनी नोटरी देखील करून दिलेली होती.

लग्न झाल्यानंतर दिपाली तक्रारदार व्यक्ती यांच्या घरी आली मात्र अवघे सहा दिवस ती राहिली आणि त्यानंतर आई आजारी असल्याचे कारण सांगून निघून गेली ती पुन्हा आलीच नाही. जाताना तिने लग्नात घातलेले सर्व दागिने घेऊन ती गेलेली होती. हतबल झालेले तक्रारदार यांनी त्यात तिला वारंवार नांदण्यास येण्याची विनंती केली मात्र ती आली नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येतात तक्रारदार यांनी संशयित व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे. अभिजीत शिवाजी जगताप ( वय 28 राहणार कवठेमहाकाळ जिल्हा सांगली ) असे तक्रारदार व्यक्ती यांचे नाव आहे.


Spread the love