पुणे हादरलं..पुस्तकांसाठीची बालगंधर्व चौकातली ‘ ती ‘ भेट पडली 17 लाखांना

Spread the love

शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यात एक खळबळजनक अशी घटना समोर आलेली असून बसप्रवास करत असताना ओळख झाल्यानंतर एका तरुणीला कोल्ड्रिंकमधून गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार करण्यात आला. तिचे अश्लील व्हिडिओदेखील काढण्यात आले आणि त्यानंतर ते व्हायरल करण्याची धमकी देत या तरुणीकडून तब्बल 17 लाख रुपये उकळण्याचा प्रकार उघडकीला आलेला आहे. सदर तरुणी ही शासकीय सेवेत कार्यरत असून आपल्या लग्नासाठी म्हणून 13 लाख रुपयांचे कर्ज काढून तिने आरोपीला पैसे दिले असल्याचे समोर आले असून आरोपी व्यक्तीच्या विरोधात शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार, फईम नईम सय्यद ( वय 30 राहणार नेहरूनगर पिंपरी ) असे आरोपीचे नाव असून त्याच्या विरोधात 27 वर्षाच्या तरुणीने फिर्याद दिलेली आहे. फिर्यादी तरुणी सांगली येथील रहिवासी असून शासकीय सेवेत कार्यरत आहे. आरोपीने त्यांना आपली ट्रॅव्हल एजन्सी असल्याचे सांगत ओळख वाढवली आणि त्यानंतर त्यांच्या संभाषण होऊ लागले. दोन नोव्हेंबर रोजी तरुणी पुण्याला येणार असल्या कारणाने आरोपीने तिच्यासाठी वेळ दिला आणि त्यानंतर त्यांनी पुण्यात पुस्तकांची खरेदी केली. बालगंधर्व चौकातील एका हॉटेलमध्ये तो तिला घेऊन गेला आणि तिथे गेल्यानंतर तिला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर त्याने बलात्कार केला.

सदर घटना घडल्यानंतर दोनच दिवसात त्याने हे व्हिडिओ व्हायरल करेल अशी धमकी देत तिच्याकडून पैशाची मागणी करण्यास सुरुवात केली. सदर तरुणीने अखेर तब्बल 16 लाख रुपये सतरा लाख रुपये त्याला कर्ज काढून दिले मात्र तरी देखील त्याची पैशाची मागणी संपत नसल्याने अखेर पोलीस ठाण्यात या तरुणीने दाखल होत त्याच्या विरोधात तक्रार दिलेली आहे. पोलीस तपासामध्ये त्याची कुठलीही ट्रॅव्हल कंपनी नसून तो एका ट्रॅव्हल एजन्सीमध्ये चालक म्हणून काम करत असल्याचे देखील समोर आलेले आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भोलेनाथ अहिवळे हे करत आहेत .


Spread the love