महाराष्ट्रात अनेक धक्कादायक घटना समोर येत असताना अशीच एक घटना सोलापूर इथे उघडकीस आली आहे . बाळे परिसरात राहणाऱ्या एका राहत्या घरी परिसरातील नावाजलेले वादक हेमंत सुधाकर भतांबरे (वय ४५, रा. वर्धमान रेसिडेन्सी बाळे, सोलापूर) यांनी साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे . सोमवारी सायंकाळी ६.३० वाजता ही घटना उघडकीस आली आणि परिसरात एकच खळबळ उडाली.
उपलब्ध माहितीनुसार, हेमंत भतांबरे हे दुपारी वरच्या मजल्यावरील खोलीत गेले होते मात्र संध्याकाळ झाली तरी ते खाली आले नाहीत.झोपलेले असतील असे समजून पत्नीने काही काळ वाट पहिली मात्र त्यानंतर त्यांनी आवाज दिल्यावर देखील काही प्रतिसाद मिळाला नाही. दरवाजाला छिद्र पाडून आतील कडी काढली असताना त्यांचा मृतदेह पंख्याला लटकलेला पाहून पत्नीने जागीच हंबरडा फोडला. त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले असता त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.
हेमंत भतांबरे हे स्थानिक ऑर्केस्ट्राबारमध्ये पियानो वाजवण्याचे काम करत होते मात्र कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून ऑर्केस्ट्राबार बंद झाल्याने आर्थिक अडचणी सुरु झाल्या होत्या. काही कालावधीपूर्वी त्यांनी बाळे येथे घर घेतले होते त्याचे हफ्ते फेडणे देखील त्यांना अशक्य होत होते . सध्या काम नसल्यामुळेच त्यांनी आत्महत्या केली आहे, अशी प्राथमिक माहिती हेमंत भतांबरे यांच्या पत्नीने पोलिसांना बोलताना दिली.