महाराष्ट्रात अनेक ठिकाणी बेकायदा पद्धतीने लॉज सुरू असून अवघ्या काही तासांच्या हिशोबाने या लॉजमध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याची प्रकरणे समोर येत आहेत असेच एक प्रकरण सध्या बीड जिल्ह्यातील गेवराई येथे समोर आलेले असून लॉजच्या नावाखाली वेश्याव्यवसायाचा अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष विभागाने 23 फेब्रुवारी रोजी पर्दाफाश केलेला आहे . शहरातील एका प्रसिद्ध लॉजवर धाड टाकून लॉज मालक ऑंटी हिच्यासह एका व्यवस्थापकाला देखील ताब्यात घेण्यात आलेले आहे तर एका पीडितेची तेथून सुटका करण्यात आलेली आहे.
उपलब्ध माहितीनुसार, सदर प्रकरणी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या प्रमुख व सहाय्यक निरीक्षक सुरेखा धस यांना याप्रकरणी माहिती मिळाली होती त्यानंतर पोलीस अधीक्षक नंदकुमार राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली गेवराई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फराटे यांच्या मदतीने सुरुवातीला बोगस गिऱ्हाईक पाठवून बनावट ग्राहक पाठवून खात्री करण्यात आली आणि त्यानंतर ग्राहकाने दोन हजार रुपये दिले त्यावेळी त्यांना एका खोलीत पाठवण्यात आले तिथे 27 वर्षाची महिला हजर होती.
बनावट ग्राहकाने पथकाला इशारा केला आणि तात्काळ पथक घटनास्थळी दाखल झाले त्यानंतर लॉज मालक असलेला सुरज विशाल निकम ( राहणार निकम गल्ली गेवराई ) आणि व्यवस्थापक राजेश गणपत चोरमले ( राहणार रेवकी देवकी तालुका गेवराई ) आणि आंटी असलेली अरुणा बाबासाहेब राठोड ( राहणार नाईक तांडा अहिल्यानगर गेवराई ) यांना ताब्यात घेतलेले असून त्यांच्या विरोधात अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा 1956 नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.