महाराष्ट्रातील एक अजब प्रकरण सध्या चर्चेत आलेले असून सोलापूर येथील ही घटना आहे. एका सोळा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आल्यानंतर ती गर्भवती झाली आणि त्यानंतर बाळाचा डीएनए आरोपीसोबत मॅच झाला मात्र कोर्टात गेल्यानंतर पीडित मुलीची आई हिने सरकारी पक्षाला मदत न करता चक्क फितूर झाली मात्र तरी देखील डीएनए रिपोर्टच्या आधारे आरोपी हा आरोपीने केलेला गुन्हा निष्पन्न झालेला असून न्यायालयाने त्याला सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे.
उपलब्ध माहितीनुसार, नागेश नारायण राऊत ( वय 24 राहणार मोहोळ ) असे आरोपीचे नाव असून त्याने पीडित मुलीसोबत ओळख करून घेतलेली होती त्यानंतर तिला जबरदस्तीने ओढ्यात नेऊन त्याने तिच्यावर अत्याचार केला त्यातून तिला दिवस गेले. पीडित मुलीच्या आईने दवाखान्यात दाखवल्यानंतर मुलीला विश्वासात घेऊन माहिती विचारली त्यावेळी तिने आरोपीचे नाव सांगितले.
2017 साली अखेर या मुलीची सिव्हिल हॉस्पिटल येथे डिलिव्हरी झाली आणि त्यानंतर तिने एका मुलीला जन्म दिला. न्यायालयीन प्रक्रिया पार पडत असताना संशयित आरोपी आणि जन्मलेले बाळ यांची डीएनए चाचणी करण्यात आली त्यामध्ये आरोपीनेच हा गुन्हा केल्याचे निष्पन्न झालेले होते मात्र न्यायालयात प्रकरण गेल्यानंतर पीडित मुलीची आई फितूर झाल्याने आरोपीला नक्की काय शिक्षा होईल याकडे लक्ष लागून राहिलेले होते. जिल्हा आणि सत्र न्यायाधीश कविता शिरभाते यांनी या प्रकरणी निर्णय दिलेला असून नागेश राऊत याला सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सोबत पाच हजार रुपये दंड ठोठावला आहे.