सासऱ्याच्या खोडीबद्दल सांगूनही व्हॅलेंटाईनच्या दिवशी ‘ नको ते ‘ घडलं

Spread the love

सोशल मीडियावर सध्या एका प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू असून राजस्थानच्या बुंदी जिल्ह्यातील हे प्रकरण आहे. एका विवाहित पुरुषाने आपल्या वडिलांवर पत्नीचे अपहरण केल्याचा आरोप केलेला असून आपली 21 वर्षांची पत्नी ही साठ वर्षांच्या आपल्या वडिलांसोबत पळून गेलेले आहे असे त्याचे म्. त्यांना एक लहान मुलगी देखील असून आपल्या पत्नीने तिची कुठलीच काळजी केली नाही आणि सासऱ्यासोबत पलायन केले त्यामुळे आपल्याला कुठे तोंड दाखवायला जागा राहिली नाही असे म्हटलेले आहे.

बुंदी जिल्ह्यातील सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात ही घटना घडलेली असून एका व्यक्तीने त्याच्या वडिलांवर त्याच्या पत्नीला पळून नेल्याचा आरोप केलेला आहे. 14 फेब्रुवारीला म्हणजे व्हॅलेंटाईनच्या दिवशी या विवाहित महिलेने सासऱ्यासोबत पलायन केले.

पीडित पतीच्या म्हणण्यानुसार आपण आत्तापर्यंत तिला कुठल्याही पद्धतीचा त्रास होऊ दिला नाही . सर्व सुखसोयी दिल्या. तिला आनंदी ठेवण्यासाठी देखील प्रयत्न केले मात्र माझे वडील तिला सतत धमकावत होते. त्यांच्या वाईट सवयींबद्दल मी पत्नीला अनेकदा समजावून सांगितले.. त्यांच्यापासून संपर्क कमी ठेवण्याचे देखील तिला सांगितले मात्र तिच्यात बदल झाला नाही. असे काही होईल याची मी स्वप्नातही कल्पना केलेली नव्हत, असे म्हटलेले आहे.


Spread the love