आरोपीच्या कोल्ड्रींकमुळे तिचा ‘ घटस्फोट ‘ झाला अन आता , पुण्यातील घटना

Spread the love

महाराष्ट्रात एक खळबळजनक अशी घटना पुणे जिल्ह्यात समोर आलेली असून कोल्ड्रिंकमधून सतत गुंगीचे औषध देऊन एका विवाहित महिलेवर बलात्कार करण्यात आल्याचा प्रकार उघडकीला आलेला आहे. आरोपीने तिला लग्नाचे आमिष दाखवले आणि तिच्या पतीपासून घटस्फोट घ्यायला भाग पाडले मात्र त्यानंतर त्याने इतरत्र लग्न केले म्हणून महिलेने दौंड पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हा नोंदवलेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार, मयूर रमेश भोसले ( राहणार पायल रेसिडेन्सी तालुका दौंड जिल्हा पुणे ) असे आरोपीचे नाव असून गुन्हा दाखल झाल्याचे समजताच तो फरार झालेला आहे . पीडित महिला आणि आरोपी मयूर भोसले यांच्यात 2021 मध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख झालेली होती त्यानंतर पीडित महिलेने त्याला माझे लग्न झालेले असून मला लहान मुलगी आहे असे देखील सांगितले होते.

आरोपी भोसले याने महिलेला तुझा आणि तुझ्या पतीचा घटस्फोट प्रक्रिया एकदा पूर्ण झाली की मी तुझ्याशी लग्न करेल असे आश्वासन पीडित महिलेला दिले आणि त्यानंतर तिला दौंड परिसरातील वेगवेगळ्या लॉजवर घेऊन जात तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. तिच्यासोबतच्या त्या संबंधाचे त्याने मोबाईलमध्ये शूटिंग काढले आणि पीडित महिलेचा अखेर घटस्फोट झाल्यानंतर त्याने लग्नासाठी टाळाटाळ सुरू केली.

एकीकडे या सर्व घडामोडी घडत असताना दुसरीकडे त्याने अचानकपणे दुसऱ्या मुलीसोबत लग्न केल्याचे पीडित महिलेला समजले त्यावेळी त्याने महिलेला झालं गेलं विसरून जा आता मी काही करू शकत नाही. आमच्या घरच्या व्यक्तींच्या पुढे मी जाऊ शकत नाही असे म्हटले आणि त्यानंतर वाद झाल्यावर महिलेला त्याने घरी जाऊन मारहाण केली. तिच्या वडिलांना देखील शिवीगाळ केली असे सांगत झाला प्रकार कुठे सांगितला तर तुझे अश्लील फोटो सोशल मीडियावर टाकील आणि तुझ्या मुलीला मारून टाकेल अशी धमकी दिली. पीडित महिलेने अखेर पोलिसात दाखल होत त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला असून पोलीस आरोपीचा सध्या शोध घेत आहेत .


Spread the love