महाराष्ट्रात एक खळबळजनक असे प्रकरण बीड येथे समोर आलेले असून मोबाईल दुरुस्तीसाठी आलेल्या मोबाईलमधून दुकानदाराने काही डाटा चोरला त्यामध्ये महिलेचा तिच्या पतीसोबत असलेला अश्लील व्हिडिओ देखील होता यानंतर या व्हिडिओच्या आधारे त्याने तिला ब्लॅकमेल करण्यास सुरू केले आणि तब्बल दोन वर्ष तिच्यावर तो अत्याचार करत होता. दुकानदाराच्या भावाने देखील तिचा विनयभंग करून तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला असे पीडित महिलेचे म्हणणे असून बीड शहरातील दोन सख्ख्या भावांच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
उपलब्ध माहितीनुसार, कमलेश काकासाहेब सांगळे आणि ऋषिकेश काकासाहेब सांगळे अशी आरोपी व्यक्तींची नावे असून कमलेश याचे मोबाईल दुरुस्तीचे दुकान आहे. बीड येथील एका महिलेने त्याला दुरुस्तीसाठी तिचा मोबाईल आणून दिलेला होता त्यावेळी मोबाईलचा पासवर्ड निघत नसल्याने तिने तो दुकानातच मोबाईल ठेवला आणि त्यानंतर घरी निघून गेली.
महिलेच्या म्हणण्याप्रमाणे त्या मोबाईल मध्ये तिच्या पतीसोबत असलेले काही नाजूक क्षण तिने कैद केलेले होते. त्याचा एक्सेस या दुकानदाराने मिळवला आणि तिला तुझा अश्लील व्हिडिओ माझ्याकडे आहे असे सांगत ब्लॅकमेल करण्यास सुरू केले आणि त्यानंतर तिच्यासोबत बीड शहरातील विविध ठिकाणी लॉजवर घेऊन जात तिच्यावर अत्याचार केले. आरोपी तरुणाचा भाऊ हा देखील तिचा सातत्याने विनयभंग करायचा म्हणून अखेर पीडित महिलेने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दोन्ही भावांच्या विरोधात तक्रार दिलेली आहे.