महाराष्ट्रात एक खळबळजनक असे प्रकरण मुंबई येथे समोर आलेले असून एका महिलेने मुंबई येथील एका व्यक्तीवर गंभीर आरोप केलेला आहे. पीडित महिला ही आरोपीची पत्नी असून सध्या ती मध्यप्रदेशात सतना येथे राहते मात्र मूळ इंदोरची आहे. मध्यप्रदेशात आपण राहत असताना आरोपी हा आपल्यासोबत अनैसर्गिक संबंध ठेवण्यासाठी इंदोर इथे यायचा असे महिलेने म्हटल्यानंतर आरोपीला मुंबईतून ताब्यात घेतलेले आहे. इंदूर पोलिसांनी त्याला अटक केलेली असून त्याची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आलेली आहे.
उपलब्ध माहितीनुसार, इंदोर येथील एमजी रोड पोलीस ठाण्यात एका महिलेने तिच्या पतीच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला होता. महिलेच्या म्हणण्यानुसार पाच वर्षांपूर्वी तिचा मुंबई येथे अभिषेक निगम नावाच्या व्यक्तीसोबत विवाह झालेला होता. लग्नानंतर आरोपी हा सतत आपल्याला अनैसर्गिक शारीरिक संबंध ठेवण्यासाठी आग्रह करत असायचा असे महिलेचे म्हणणे आहे त्याच्या या त्रासाला कंटाळून महिला अखेर इंदोरला निघून आली.
इंदूरला निघून आल्यानंतर तरी त्याच्या वर्तनात बदल होईल अशी आपल्याला अपेक्षा होती मात्र तो इंदोर येथील एमजी रोड येथील आपल्या घरी अनैसर्गिक शारीरिक संबंध ठेवण्यासाठी मुंबईवरून बसने सकाळी आपल्या घरी दाखल व्हायचा. इंदूर येथे त्याने अनेकदा आपल्यासोबत अनैसर्गिक शारीरिक संबंध ठेवलेले असून त्यामुळे आपल्याला त्रास सुरू झालेला आहे. त्याच्या या त्रासाला वैतागून अखेर महिलेने एमजी रोड पोलीस ठाण्यात आरोपी पतीच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला असून इंदोर पोलिसांनी त्यानंतर मुंबई येथे पोहोचत आरोपीला ताब्यात घेतलेले आहे. आपल्याला अटक होऊ शकते या भीतीने काही काळ तो परदेशात देखील निघून गेला होता मात्र मुंबईत आल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आलेले आहे.