आईच ऐकलं नाही अन सहा महिन्यांनी ‘ ह्या ‘ परिस्थितीत माहेरी

Spread the love

महाराष्ट्रात एक खळबळजनक असे प्रकरण समोर आलेले असून माझे तुझ्यावर प्रेम आहे आपण लग्न करू अशी बतावणी करत एका अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण करण्याचा प्रकार समोर आलेला आहे. धक्कादायक बाब म्हणजे यानंतर पुढे मुलीला दिवस गेले आणि त्यानंतर आरोपीने लग्नाला नकार दिला. अकोला जिल्ह्यातील हे प्रकरण असून मंगळूरपीर पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकलेल्या आहेत.

उपलब्ध माहितीनुसार, एक पंधरा वर्षाची अल्पवयीन मुलगी गेल्या सहा महिन्यांपासून शेख राजीक शेख मोहम्मद ( राहणार शेलुबाजार ) याच्यासोबत त्याच्या घरी राहत होती. मुलीला घरी परत ये असे म्हटल्यानंतर ती आपण त्याच्यासोबत लग्न करणार आहोत असे सांगत घरी येण्यास नकार द्यायची आणि काही विघ्न आणले तर आपण जीवाचे बरे वाईट करून घेऊ असे देखील म्हणायची त्यामुळे फिर्यादी यांनी भीतीपोटी पोलिसात तक्रार दिली नाही.

15 फेब्रुवारी रोजी अल्पवयीन मुलगी पुन्हा घरी आली त्यावेळी तिच्या आईने तिला विचारले तेव्हा तिने रडायला सुरू केले आणि आपल्यावर घडलेला अन्याय सांगितला. आरोपी शेख राजिक शेख मोहम्मद याने आपल्याला लग्नाला नकार दिलेला आहे असे सांगत त्याने आपले लैंगिक शोषण केले त्यातून आपल्याला दिवस गेलेले असून चार महिन्यांचे आपण गर्भवती आहोत अशी देखील तिने माहिती दिली त्यानंतर अल्पवयीन मुलीच्या आईने पोलिसात धाव घेत आरोपीच्या विरोधात तक्रार नोंदवलेली आहे.


Spread the love