महाराष्ट्रात फसवणुकीचा अजब प्रकार समोर आलेला असून माझ्या मुलीचे लग्न तुझ्यासोबत लावून देतो असे सांगत एका तरुणाला स्वप्नाच्या दुनियेत रमवत एका कुटुंबाने त्याच्याकडून तब्बल दहा लाख रुपये आत्तापर्यंत उकळलेले असून सांगली जिल्ह्यातील आटपाटी तालुक्यातील हे प्रकरण आहे. आपली फसवणूक झाल्याची जाणीव होतात या तरुणाने अखेर तरुणी आणि तिच्या कुटुंबीयांच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केलेली आहे.
उपलब्ध माहितीनुसार, आटपाटी तालुक्यातील खांजोडवादी गावातील रहिवासी असलेला अमर अप्पासाहेब सूर्यवंशी याने असे फसवणूक झालेल्या तरुणाचे नाव असून त्याने स्नेहा नानासाहेब मोरे, अलका नानासाहेब मोरे , अविनाश नानासाहेब मोरे, नानासाहेब अर्जुन मोरे ( सर्वजण राहणार घनचक्कर मळा दिघंची ) आणि प्रतिभा संतोष जाधव ( राहणार महूद तालुका सांगोला ) यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केलेला आहे.
तक्रारदार व्यक्ती यांच्या म्हणण्यानुसार मार्च 2022 पासून डिसेंबर 2022 पर्यंत स्नेहा हिच्यासोबत तुझे लग्न लावून देईल असे बोलत या कुटुंबीयांनी अमर सूर्यवंशी यांचा विश्वास संपादन केलेला होता त्यानंतर त्यांच्याकडून वेगवेगळ्या कारणासाठी म्हणत कुटुंबीयांनी रोख रक्कम आणि किमती साहित्य मिळवले . अमर यांनी देखील स्नेहा आपली भावी पत्नी होणारच आहे या आशेने तिला अनेक महागड्या वस्तू भेट दिलेल्या होत्या.
अविनाश मोरे याला सोन्या-चांदीचे दुकान सुरू करण्यासाठी 18 लाख रुपयांची मागणी मोरे कुटुंबीयांकडून करण्यात आली. जर हे पैसे तू दिले नाहीस तर स्नेहा तिच्यासोबत तुझे लग्न लावून दिले जाणार नाही असे त्यांनी सांगण्यास सुरुवात केली. तक्रारदार व्यक्ती यांनी याआधी आपण दिलेले पैसे त्यांना मागितले त्यावेळी त्यांना पैसे परत देणे शक्य नाही असेही सांगण्यात आले शिवाय तगादा लावला तर आम्ही आत्महत्या करू असे सांगितल्यानंतर हतबल झालेले तक्रारदार यांनी अखेर आटपाटी पोलिसात या प्रकरणी गुन्हा दाखल केलेला आहे.