प्रेमप्रकरण जुळल्यानंतर घरी कसे सांगायचे याच्यासाठी अनेक जण वेगवेगळे बहाणे बनवतात .असाच एक बहाना बनवून एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आलेली आहे. धक्कादायक म्हणजे आरोपी व्यक्तीने पीडित मुलीला आपल्याला नोकरी लागलेली आहे म्हणून आपण घर सोडून इतरत्र राहतोय असे तिच्या घरी सांगण्यास सांगितले आणि ती त्याच्यासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. नागपूर येथील जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडलेली आहे.
उपलब्ध माहितीनुसार, मोनल राजेंद्र मेश्राम ( वय 27 जरीपटका ) असे आरोपी व्यक्तीचे नाव असून पीडित सतरा वर्षीय मुलीसोबत त्याची 2020 साली ओळख झालेली होती. त्यावेळी ती 14 वर्षांची होती. कोरोनाच्या काळात आरोपीने तिच्यावर अनेकदा शारीरिक अत्याचार केले आणि त्यानंतर आपल्याला नोकरी लागलेली आहे असे त्याने तिला तिच्या पालकांना सांगण्यास सांगितले आणि त्यानंतर फसवून ते दोघे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते . दरम्यानच्या काळात त्याने तिला शारीरिक त्रासदेखील दिला आणि प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचले. पोलिसांनी आरोपी मोनल मेश्राम याला अटक केलेली आहे.