महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर होताना पाहायला मिळत असून असेच एक प्रकरण सध्या अमरावती शहरात समोर आलेले आहे. शहरातील इरवीन चौकातून चक्क एका महिलेच्या पतीसमोरच तिचे अपहरण करण्यात आलेले आहे. 6 मार्च रोजी रात्री दहाच्या सुमारास ही घटना घडलेली असून धक्कादायक बाब म्हणजे पतीला मारहाण करण्यात आली आणि त्यानंतर महिलेचे अपहरण करण्यात आले.
इरवीन चौकात ही महिला तिच्या पतीसोबत उभी होती त्यावेळी अचानकपणे एक ऑटोरिक्षा तिथे येऊन पोहोचली आणि त्यानंतर रिक्षामधील दोन अनोळखी व्यक्तींनी महिलेच्या पतीला बेदम मारहाण केली. महिलेचा पती हा मद्यधुंद अवस्थेत असल्याकारणाने तो स्वतःचा देखील बचाव करू शकला नाही त्याचवेळी दोन जणांनी या महिलेला रिक्षात बसवले आणि त्यानंतर पळवून नेले. सात मार्च रोजी पहाटे पती पोलीस ठाण्यात पोहोचला आणि त्यानंतर शहर कोतवाली पोलिसांनी दोन इसमांच्या विरोधात अपहरण आणि मारहाणीचा गुन्हा दाखल केलेला आहे.