पोलीस म्हटल्यानंतर सर्वसाधारणपणे कायद्याचे पालन करणारा व्यक्ती असेल अशी प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर उभी राहते मात्र पुण्यात एक वेगळाच प्रकार समोर आलेला असून अलंकार पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक यांनी लाच मागितल्यावरून निलंबित करण्याचे आदेश अतिरिक्त पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे यांनी दिलेले आहेत. अरविंद शिंदे असे या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव असून डहाणूकर कॉलनी पोलीस चौकी येथे ते नियुक्तीला होते.
एरंडवणे भागातील अलंकार पोलीस ठाण्याच्या हद्दीत घराच्या मालकी हक्कावरून परस्परविरोधी गुन्हा दाखल करण्यात आलेला होता या प्रकरणी तपास शिंदे यांच्याकडे सोपवण्यात आलेला नव्हता मात्र तरीदेखील शिंदे यांनी आरोपीला मोबाईलवर संदेश पाठवून पोलीस चौकीत बोलावून घेतलेले होते. त्यावेळी त्यांनी तक्रारदार व्यक्ती यांना अटक करण्याची भीती दाखवत 50 हजार रुपये देखील घेतलेले होते.
सदर प्रकरणी वरिष्ठात तक्रार दाखल झाल्यानंतर चौकशी करण्यात आली त्यामध्ये चौकशीत तथ्य आढळून आल्यानंतर अखेर पोलीस दलाची प्रतिमा मलीन केल्याप्रकरणी शिंदे यांना पोलीस दलातून निलंबित करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. तक्रार दाखल झाल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही चौकशी पार पडली होती त्यानंतर अहवाल आल्यानंतर कारवाई करण्यात आलेली आहे.