महाराष्ट्रात एक खळबळजनक असे प्रकरण जळगाव जिल्ह्यात समोर आलेले असून सोशल मीडियावर मैत्री झाल्यानंतर एका तरुणाने 18 वर्षीय तरुणीला लग्नाचे आमिष दाखवले आणि दोन वर्षांपासून तिच्यावर अत्याचार केल्यानंतर ती गर्भवती राहिल्यानंतर त्याने चक्क तिला पपई आणि कॉफी पाजून तिचा गर्भपात केला. रविवारी हे प्रकरण समोर आलेले असून रामानंदनगर पोलीस ठाण्यात आरोपी तरुणासोबत त्याच्या आई-वडिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
उपलब्ध माहितीनुसार, जळगाव शहरातील एका भागात 18 वर्षाची ही तरुणी तिच्या आई-वडिलांसोबत राहत असून तिची सोशल मीडियाच्या माध्यमातून एरंडोल शहरातील इस्लामपुरा भागात राहणारा हसन असलम मोमीन याच्यासोबत ओळख झालेली होती. ओळख झाली त्यावेळी पीडित मुलगी ही अल्पवयीन होती त्यानंतर या ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले आणि हसन याने तिला लग्नाचे आमिष दाखवले. तरुणीने त्याला तिच्या घरच्यांशी बोलण्याचा सल्ला दिला त्यानंतर तो मुलीच्या घरच्यांना देखील जाऊन भेटला आणि तिला मागणी घातली.
त्याचे स्वतःचे आई-वडील लग्नासाठी तयार नाहीत असे देखील त्याने सांगितले आणि दोन वर्षानंतर मी त्यांची समजूत काढेल असे देखील तो म्हणाला त्यानंतर त्याने या तरुणीला तिच्या मनाविरुद्ध वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जात तिच्यावर अत्याचार केले त्यानंतर मुलीच्या घरच्यांनी त्याला लग्नासाठी विचारले त्यावेळी आपले आई-वडील यासाठी तयार नाहीत असे म्हणत टाळाटाळ करायला सुरुवात केली आणि त्याच्या विरोधात पोलिसात शहर पोलिसात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आणि त्याला अटकही करण्यात आलेली होती.
अटक करण्यात आल्यानंतर त्याच्या आई-वडिलांनी मुलीच्या कुटुंबीयांना गुन्हा मागे घ्या लग्न लावून देऊ अशी विनंती केली त्यानंतर तो जेलमधून बाहेर आल्यानंतर मुलीच्या घरच्यांनी लग्नासाठी मागणी सुरू केली मात्र त्यांनी पुन्हा टाळाटाळ करण्यास सुरू केली. दरम्यानच्या काळात तरुणीसोबत त्याने शारीरिक संबंध ठेवले आणि ती गर्भवती झाल्यानंतर त्याच्या आईने आणि त्याने या तरुणीला चक्क पपई आणि कॉफी देऊन तिचा गर्भपात केला . तरुणीला या प्रकरणाने चांगलाच धक्का बसला आणि तिने झाला प्रकार आई-वडिलांना सांगितला.
गर्भपात झाल्यानंतर मुलीच्या वडिलांनी हसन याच्या आई-वडिलांना बोलावून घेतले त्यावेळी तुम्ही लग्नपत्रिका छापून घ्या आपण लग्न लावून टाकू असे सांगितल्यानंतर मुलीच्या घरच्यांनी पत्रिका देखील छापल्या आणि लग्नाची तयारी केली. दारात मांडव देखील टाकला मात्र तरुण हसन आणि त्याच्या घरचे कोणीच लग्नाला आले नाही . मुलीच्या वडिलांना त्यांनी आम्हाला हे लग्न करायचे नाही असे सांगितले त्यानंतर रविवारी रात्री अकराच्या सुमारास संशयित हसन असलम मोमीन त्याची आई मुन्नी यांच्याश आणखी एक जण यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.