पुणे हादरलं..प्रियकराने लग्नाला नकार दिला अन ‘ नको ते ‘ घडलं

Spread the love

महाराष्ट्रात एक खळबळजनक अशी घटना पुणे जिल्ह्यात समोर आलेली असून प्रियकराने लग्नाला नकार दिल्यानंतर एका बावीस वर्षीय तरुणीने चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केलेली आहे. दौंड तालुक्यातील ही घटना असून दौंड पोलिसांनी याप्रकरणी आरोपी प्रियकराच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केलेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार, साक्षी मोरोपंत गायकवाड असे आत्महत्या केलेल्या बावीस वर्षीय तरुणीचे नाव असून ती दौंड येथील लाल चर्च मार्ग परिसरात राहत होती आणि शहरातील एका रुग्णालयात पॅथॉलॉजी लॅब येथे काम देखील करत होती . परिसरातील निखिल साबळे नावाच्या तरुणासोबत तिचे प्रेमसंबंध देखील होते मात्र त्याने तिला लग्नाला नकार दिला त्यामुळे ती तणावात होती.

अकरा मार्च रोजी साक्षी हिने तिचा भाऊ कौशल गायकवाड याला याप्रकरणी माहिती दिली आणि कौशल याने तिची समजूत देखील काढलेली होती मात्र ती तणावात असल्याकारणाने इतके टोकाचे पाऊल उचलेल असे कुणालाही वाटले नव्हते. घरातील सर्व सदस्य झोपी गेल्यानंतर तिने इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारली आणि त्यात तिचा मृत्यू झाला. तिचा भाऊ कौशल गायकवाड याने पोलिसात तक्रार दिलेल्या असून आरोपी प्रियकर निखिल साबळे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पोलीस उपनिरीक्षक सुनिता चौरे या प्रकरणाचा तपास करत आहेत.


Spread the love