‘ हट्टाकट्टा ‘ पती सोडून सहा मुलांची आई अल्पवयीन प्रियकरासोबत फरार , आता म्हणतेय की ..

Spread the love

प्रेमासाठी कोण काय करेल याचा भरवसा राहिलेला नाही . अशीच एक धक्कादायक घटना समोर आलेली असून चक्क सहा मुलांची आई १४ वर्षांच्या मुलाच्या प्रेमात पडली अन् पळून गेल्याची घटना गुजरात इथे समोर आलेली आहे . गुजरातच्या दाहोद जिल्ह्यातील सुखसार पोलीस या प्रकरणाची चौकशी करत असून आपला मुलगा अल्पवयीन असून तो १४ वर्षांचा असल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे तर महिलेनेच आपल्या मुलाला भुलवून पळवून नेले असल्याचे त्याच्या कुटुंबियांचे म्हणणे आहे. मुलाच्या वयाची खात्री करण्यासाठी त्याच्या कुटुंबीयांना मुलाचा जन्म दाखला आणण्यास पोलिसांनी सांगितले आहे.

उपलब्ध माहितीनुसार, पळून गेलेल्या महिलेचा पती धडधाकट असून या महिलेला चक्क सहा मुले आहेत असे असताना देखील तिचे गांधीनगरमध्ये मजूर म्हणून काम करत असलेल्या मुलासोबत सूत जुळले आणि ती पळून गेली. पोलीस मुलाच्या जन्मदाखल्याच्या प्रतीक्षेत असून जर मुलगा अल्पवयीन असेल तर पोलीस महिलेविरोधात बाल लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षण अर्थात पोक्सो कायद्याच्या तरतुदींनुसार गुन्हा दाखल करतील. विवाहित महिलेसोबत पळून गेलेला मुलगा हा दाहोद जिल्ह्यातील फतेपुरा तालुक्यातील अमलीखेडा गावचा आहे.

सदर प्रकरण हे एक महिना जुने असून एका मुलाच्या कुटुंबीयांनी त्यांच्या १४ वर्षांच्या अल्पवयीन मुलाचे या महिलेने अपहरण केल्याची तक्रार घेऊन सुखसर पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. पुरावा म्हणून कुटुंबीयांनी चक्क त्याचे आधारकार्ड देखील पोलिसांना दाखवले असून आधारकार्डनुसार त्याचे जन्म वर्ष २००७ आहे मात्र काही पुराव्यावरून त्याचा जन्म हा १९९७ चा असल्याचे देखील समोर आल्याने पोलिसांनी त्याच्या कुटुंबियांना जन्म दाखला सादर करण्यास सांगितले आहे.

सदर संबंधाची माहिती पडताच दोन्ही कुटुंबांनी चर्चेमधून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला मात्र महिला कोणाचेच ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती त्यामुळे कोणत्याच आर्थिक वाटाघाटीला देखील यश आले नाही . महिलेच्या पतीच्या म्हणण्यानुसार, सदर तरुण आपल्या पत्नीला पळून जाण्याचे आमिष दाखवत असल्याच्या विरोधात आपण प्रथम अमलीखेडा येथील मुलाच्या कुटुंबाशी संपर्क साधला होता. मुलाच्या कुटुंबीयांनी दोघांनाही शोधून काढले आणि समस्या सोडवण्यासाठी त्यांना गावात परत आणत असतानाच दोघेही संतरामपूर येथून पळून गेले. हतबल पती आता पोलीस ठाण्याच्या चकरा मारत असून महिला मात्र प्रियकरासोबत राहण्यावर ठाम असल्याचे समजते.


Spread the love