अपनी राणी किसी की दीवानी हो गई , राजकीय पदाधिकाऱ्याचे स्टेट्स अन..

Spread the love

महाराष्ट्रात एक खळबळजनक असे प्रकरण सध्या समोर आलेले असून तुझ्याशिवाय मी जगू शकत नाही अशी भावना एका तरुणाची होती मात्र त्यानंतर या तरुणीचे दुसऱ्या एका व्यक्तीसोबत प्रेमप्रकरण सुरू झाले म्हणून तो नैराश्यात गेला आणि अखेर त्याने व्हाट्सअप आणि इंस्टाग्रामवर स्टेटस ठेवत आपल्या सोबत घडलेला प्रकार समाज माध्यमात सांगून अखेर गळफास लावून आत्महत्या केलेली आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यात असलेल्या देऊळगाव मही येथील हे प्रकरण असून गजानन गुरव ( वय 26 वर्ष ) असे या मयत तरुणाचे नाव आहे. गजानन गुरव याचे गावातील एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते मात्र या तरुणीने काही दिवसानंतर इतरत्र आपले नाते जुळवले त्यामुळे हा तरुण नैराश्यात गेलेला होता त्यातून त्याने खंडोबा मंदिर परिसरात एका झाडाला गळफास घेतला त्यात त्याचा मृत्यू झाला.

आत्महत्या करण्यापूर्वी त्याने व्हाट्सअप आणि इंस्टाग्रामवर स्टेटस ठेवत स्वतःला संपवलेले असून आपल्या मित्र परिवाराला देखील त्याने आत्महत्या करण्यापूर्वी भावनिक संदेश दिलेला होता. त्यामध्ये त्याने ‘ आपल्या गर्लफ्रेंडने आपल्याला धोका दिला. अपनी राणी किसी की दीवानी हो गई..मी मेल्यावर माझी आठवण काढशील का ? ‘ असे देखील त्याने स्टेटसमध्ये म्हटलेले होते.

मयत गजानन गुरव हा काँग्रेस पक्षाशी संबंधित होता त्याने राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात त्याचा मित्रपरिवार देखील जोडलेला होता . सामाजिक आणि राजकीय कार्यात सतत अग्रेसर राहणारा गजानन हा अत्यंत मनमिळाऊ स्वभावाचा होता. त्याच्या जाण्याने त्याचा मित्रपरिवार आणि कुटुंबीय यांच्यावर एकच शोककळा पसरलेली आहे .


Spread the love