देशात एक खळबळजनक असे प्रकरण सध्या कर्नाटकात समोर आलेले असून विश्वेश्वरय्या रेल्वे स्थानकात एका महिलेचा मृतदेह आढळून आलेला आहे. पोलिसांनी तात्काळ तपासाला सुरुवात केली आणि या प्रकरणाची पाळेमुळे अखेर खणून काढण्यात आलेली आहे . सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तीन जणांना पोलिसांनी अटक केली असून सध्या ते पोलीस कोठडीत आहेत.
उपलब्ध माहितीनुसार, कमल, तनवीर आणि साकीब अशी या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून प्रकरणातील इतर पाच आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे. मयत महिलेचा पहिल्या पतीसोबत घटस्फोट झाल्यानंतर तिने दुसऱ्या तिने दिरासोबत दुसरा विवाह केलेला होता. तमन्ना असे या महिलेचे नाव असल्याची माहिती आहे.
तमन्ना हिचे तिचा पहिला पती अफरोज याच्यासोबत लग्न झालेले होते त्यानंतर काही दिवसातच तिने त्यांच्यातील वादाला कंटाळून तिच्या पतीला तलाक दिला आणि त्यानंतर अफरोज याचा चुलत भाऊ असलेला इमतीखाब त्याच्यासोबत दुसरा विवाह केला त्यावरून तिच्या पहिल्या पतीच्या घरात आणि नवीन घरात वाद सुरू झालेले होते. इमतीखाब याचा एक नातेवाईक बंगळुरू येथे नोकरी करत असून त्याने तमन्ना आणि त्याला 12 मार्च रोजी त्याच्या घरी जेवणाचे आमंत्रण दिलेले होते.
जेवण झाल्यानंतर त्यांच्यात भांडण झाले आणि ज्यांच्या घरी ते जेवण्यासाठी गेलेले होते तो आरोपी नवाब याने इमतीखाब याला घरातून जाण्यास सांगितले त्यानंतर तमन्ना हिला बिहारला पाठवून देईल असे देखील तो म्हणाला . घरात आठ लोक असल्याकारणाने इमतीखाब हा घाबरून गेलेला होता त्यामुळे तो निघून गेला त्यानंतर आरोपींनी तमन्ना हिचा दुपट्ट्याने गळा आवळून खून केला आणि तिचा मृतदेह एका ड्रममध्ये ठेवून आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला . पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या प्रकरणाचा तपास लावलेला असून नवाब आणि इमतीखाब यांच्यात वादाचे कारण काय होते ते अद्यापपर्यंत समोर आलेले नाही.