बायकोला चक्क प्रोमोशनसाठी ‘ बॉस ‘ कडे पाठवलं अन त्यानंतर रात्रभर..

नात्याला काळीमा फासणारे एक प्रकरण सध्या समोर आलेले असून पीडित महिलेचा पती हा सध्या पुण्यात राहत आहे. आपला साता जन्माचा साथीदार म्हणून तिने या व्यक्तीसोबत लग्न केलेले होते मात्र या पतीने तिला आपला अभिमान आणि सन्मान न समजता चक्क ऑफिसमधून प्रमोशन मिळवण्यासाठी बॉससोबत शारीरिक संबंध ठेवण्यास तिला मजबूर केलेले आहे. धक्कादायक बाब म्हणजे सदर प्रकार घडल्यानंतर आरोपीच्या दिराने देखील तिच्यासोबत तसेच वर्तन करण्याचा प्रयत्न केला त्यानंतर या महिलेने तिच्या माहेरी मध्यप्रदेशातील इंदोर येथे धाव घेतलेली आहे.

महिलेच्या म्हणण्यानुसार, लग्नानंतर काही वर्ष सर्व काही ठीक होतं मात्र त्यानंतर पतीला काही वाईट संगत लागली आणि त्यानंतर तो आपल्यावर चुकीच्या गोष्टी करण्यासाठी दबाव टाकत होता. नोकरीत त्याला प्रमोशन मिळावे म्हणून त्याने चक्क आपल्याला त्याच्या बॉससोबत एक रात्र घालवण्यास सांगितले आणि त्याच्या बॉसने देखील मर्यादा ओलांडत आपल्याला वासनेचे शिकार बनवले. अमित असे या पतीचे नाव असून तो मूळचा महाराष्ट्राबाहेरचा रहिवासी आहे.

महिलेने पुढे म्हटल्याप्रमाणे, ‘ तिचा दीरदेखील तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करत होता. तिच्या बारा वर्षाच्या मुलीसोबत समोर देखील त्याने अनेकदा अश्लील कृत्य केलेले आहे. महिलेने आवाज उठवला त्यावेळी तिलाच मारहाण करण्यात आली. हतबल झालेल्या या विवाहितेने अखेर स्वतःच्या हाताची नस कापून घेण्याचा देखील प्रयत्न केला होता मात्र त्यातून ठीक झाल्यावर अखेर 2022 ती कंटाळून अखेर तिच्या माहेरी निघून गेली. आपल्या पत्नीवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी असे तिचे म्हणणे असून पोलिसांनी प्रकरणाच्या तपासाला सुरुवात केलेली आहे.