पुण्यात आली अन ‘ नवरा ‘ सोडून सगळंच पळवलं , परप्रांतियांसोबत विवाहिता फरार

Spread the love

महाराष्ट्रात एक खळबळजनक असे प्रकरण सध्या समोर आलेले असून हिंगोली येथील एक महिला तिच्या उत्तर प्रदेश येथील प्रियकरासोबत पळून गेलेली होती . काही दिवसात या महिलेने तिच्यासोबत पुन्हा एकदा आपल्या दोन अल्पवयीन मुली देखील पळून नेलेल्या असून सदर प्रियकर आणि या महिलेच्या विरोधात हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार, अमित कुमार उर्फ जितू पाल ( राहणार आग्रा उत्तर प्रदेश ) असे आरोपीचे नाव असून तो पुणे येथे कामाला होता. हिंगोली जिल्ह्यातील एक जोडपे दोन अल्पवयीन मुलींसह त्या परिसरात राहत होते तेव्हा महिलेची अमित कुमार याच्यासोबत ओळख झाली आणि त्यांच्यात प्रेमसंबंध सुरू झाले त्यामुळे महिलेने त्याच्यासोबत पुण्यातून आग्रा येथे पलायन केले.

हतबल झालेल्या पतीला आता पुण्यात राहून काही फायदा नाही हे लक्षात आल्यानंतर दोन अल्पवयीन मुलींना घेऊन त्यांनी पुन्हा आपले हिंगोली जिल्ह्यातील घर गाठले आणि 14 मार्च रोजी दोन अल्पवयीन मुलीदेखील त्यांच्या घरातून गायब झाल्या. त्यांचा सर्वत्र शोध घेतला मात्र ज्या आढळून आल्या नाही म्हणून अखेर पतीने पोलिसात तक्रार दिलेल्या असून तक्रारीत म्हटल्याप्रमाणे अमित कुमार आणि आपल्या पत्नीने दोन्ही अल्पवयीन मुलींना देखील फूस लावून पळवले असल्याचे म्हटलेले आहे. पोलिसांनी अमित कुमार पाल आणि सदर महिला यांच्याविरोधात मंगळवारी गुन्हा दाखल केलेला असून तपासाला सुरुवात केली आहे .


Spread the love