महाराष्ट्रात एक खळबळजनक असे प्रकरण सोलापूर येथे समोर आलेले असून आरोग्य केंद्रातील कर्मचारी काम करण्यासाठी फिल्डवर गेल्यानंतर त्यांचा पाठलाग करत आणि त्यांचा रस्ता अडवत शासकीय कामकाजात अडथळा आणल्या प्रकरणी एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. फिर्यादी डॉक्टर यांनी याप्रकरणी पोलिसात दाखल होत आरोपीच्या विरोधात तक्रार दिलेली आहे.
उपलब्ध माहितीनुसार, फिर्यादी या डॉक्टर असून एका नागरी आरोग्य केंद्रात रुग्णसेवा करत आहेत. त्यांच्यासोबत पुरुष आणि महिला असे एकूण 22 कर्मचारी काम करत असून रुग्णसेवेसाठी बाहेर जात असताना आरोपी निखिल नागनाथ मुरगुंडे ( राहणार शेळगी गावठाण ) याने त्यांचा रस्ता अडवला आणि त्रास देणे सुरू केले. सुरुवातीला त्याच्याकडे फिर्यादी यांनी दुर्लक्ष केले मात्र त्यामुळे त्याने पुन्हा एकदा असा प्रकार केला.
चार मार्च रोजी त्याने महिला कर्मचाऱ्यांच्या गाडीला दगड मारला आणि गैरवर्तन केले सोबतच त्यांच्या पायाला मारून त्यांना जखमी केले अशी फिर्याद या महिला डॉक्टरने दिलेली असून पोलिसांनी आरोपी निखिल मुरगुंडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला असून पोलिसांनी प्रकरणाच्या तपासाला सुरुवात केलेली आहे.