पुण्यात तब्बल 200 लोकांना ‘ इतक्या ‘ कोटी रुपयांना चुना , झालं असं की ?

Spread the love

पुण्यात एक खळबळजनक असे प्रकरण समोर आलेले असून लॉकडाऊन असतेवेळी कर्ज थकल्याचा गैरफायदा घेत कर्ज पुन्हा टॉप करून देतो असे सांगून एकाच वेळी अनेक बँकांमधून कर्ज घेऊन दिले आणि त्यानंतर ते कर्ज आपल्या कंपनीत गुंतवण्यास लावले आणि सुमारे 200 लोकांना 300 कोटी रुपयांचा चुना लावत संचालक ऑफिस बंद करून पळून गेल्याचे प्रकरण समोर आलेले आहे.

उपलब्ध माहितीनुसार, सेलवा कुमार नडार ( राहणार कुमार पृथ्वी अपार्टमेंट कोंढवा ) असे आरोपीचे नाव असून त्याच्या विरोधात लोहगाव येथील एका तरुणाने बंडगार्डन पोलिसात फिर्याद दिली आहे. आरोपीने अष्टविनायक इन्व्हेस्टमेंट नावाने एक कंपनी सुरू केली होती त्यामध्ये लॉकडाऊन काळात कर्ज थकबाकीदार असलेल्या आयटी क्षेत्रातील लोकांची माहिती मिळवली आणि तुमचे कर्ज मी घेतो असे सांगत त्यांच्याकडून तीन बँकांचे केवायसी डॉक्युमेंट घेतले आणि तीन बँकांकडून कर्ज काढले. जुने कर्ज फेडून सिबिल स्कोर क्लीन झाल्यानंतर नवीन कर्ज मिळणे सोयीचे झाले आणि त्याचा आरोपीने गैरफायदा घेतला.

तक्रारदार यांच्या म्हणण्यानुसार कर्ज घेतल्यावर सिबिल स्कोर नोंदवण्यात सिबिल स्कोरवर रेकॉर्डवर येण्यापर्यंत 45 दिवसांचा कालावधी लागतो. त्याने एकाच्या नावावर एकाच वेळी तीन तीन बँकांकडून लाखो रुपयांचे कर्ज घेतले आणि सर्व कर्ज हे अष्टविनायक इन्व्हेस्टमेंटमध्ये ठेवी स्वरूपात ठेवण्यास सांगितले मात्र बावीस फेब्रुवारी 2023 रोजी ऑफिसला कुलूप लावून तो निघून गेलेला असून फसवणूक झाल्यानंतर तक्रारदार यांनी पोलिसात धाव घेतलेली आहे .


Spread the love