पुण्यात एक खळबळजनक असा प्रकार समोर आलेला असून पुणे सातारा रोडवर बालाजी नगर परिसरात एका मसाज सेंटरमध्ये जाऊन आपण पोलीस असल्याची बतावणी करत दीड लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या तोतया पोलिसाला सहकारनगर पोलिसांनी अटक केलेली आहे.
उपलब्ध माहितीनुसार, अजित मधुकर वाळे ( वय 27 राहणार हडपसर ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून सदर प्रकार हा मॅजेस्टिक मसाज सेंटर येथे घडलेला आहे. आरोपीच्या विरोधात विश्वजीत महादेव काळे ( वय 24 राहणार स्वर्ग हॉटेल आंबेगाव ) यांनी तक्रार दिलेली असून ते मॅजेस्टिक मसाज सेंटर इथे व्यवस्थापक म्हणून काम करतात.
आरोपी अजित वाळे हा खाजगी कंपनीत काम करत असून सुरुवातीला त्याने आपण पोलीस अधिकारी आहोत अशी बतावणी केली आणि ‘ तुमच्याकडे वेश्याव्यवसाय चालतो म्हणून तुमच्याकडची एक मुलगी मला वेश्यागमनासाठी द्या ‘ अशी मागणी केलेली होती. तक्रारदार व्यक्ती यांनी तात्काळ पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपीच्या विरोधात तक्रार नोंदवली आणि त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.