‘ बाळ तुमचं नाही ‘, बाळंत झालेल्या बायकोने नवऱ्याला खिजवलं अन..

Spread the love

आपल्या नवऱ्यासोबत मस्करी करणे एका महिलेला चांगलेच महागात पडलेले असून संतापलेल्या पतीने केलेल्या हल्ल्यात या पत्नीने प्राण गमावले आहेत. आरोपी पतीने तिची आणि तिच्या 43 दिवसांच्या बालकाची देखील हत्या केलेली असून सदर घटना हैदराबादमधील अब्दुल्लापूरमेट परिसरातील अनाजपुर गावात घडलेली आहे.

वाय धनराज असे आरोपीचे नाव असून घटनेच्या दिवशी दुपारी प्रसूती झाल्यानंतर आई-वडिलांच्या घरून महिला पतीच्या घरी परतलेली होती. पती घरी आला आणि त्यांच्यामध्ये संभाषण सुरू असताना पत्नीने चेष्टा करत हा मुलगा तुमचा नाही असे म्हटले त्यावरून धनराज संतापला आणि त्याने तिच्या डोक्यात बियरची बाटली मारली त्यामध्ये ती बेशुद्ध झाली. त्याने त्यानंतर तिच्यावर कुऱ्हाडीने वार केले त्यात तिचा मृत्यू झाला त्यानंतर अवघ्या 43 दिवसांच्या बाळाला देखील त्याने नालीत फेकून दिले त्यात या बाळाचा देखील मृत्यू झाला.

सदर पती-पत्नीत गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरू होते. चारित्र्याच्या संशयावरून अनेकदा आरोपी तिच्यासोबत भांडायचा भांडत असायचा. आरोपी धनराज हा मजुरी काम करत असून बुधवारी दुपारी त्याच्या मोठ्या मुलीने वडिलांना आईला घरात मारहाण करताना पाहिलेले होते त्यानंतर या मुलीने तिच्या आजोळी फोन केला मात्र महिलेच्या माहेरचे व्यक्ती येईपर्यंत तिचा मृत्यू झालेला होता. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलेले असून त्याची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आलेली आहे .


Spread the love