पुणे शहरात एक खळबळजनक असे प्रकरण सध्या समोर आलेले असून प्रेमाचे नाटक करून त्यानंतर एका तरुणाला पूर्णपणे आपल्या जाळ्यात ओढण्यात आले आणि त्याच्याकडून लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने घेतल्यानंतर प्रेयसी त्रास देत असल्याकारणाने या तरुणाने अखेर इमारतीच्या सातव्या मजल्यावर गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे.
उपलब्ध माहितीनुसार, युवराज मल्हारी सोनवणे ( वय ३३ राहणार टिटवाळा कल्याण ) असे याप्रकरणी आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून त्याच्या पत्नीने खडकी पोलीस ठाण्यात आरोपी तरुणीच्या विरोधात फिर्याद दिलेली आहे. पोलिसांनी त्यानंतर या तरुणीसोबत इतर चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे.
ज्योती गिरी असे या तरुणीचे नाव असून 2017 पासून तिचे मयत युवक युवराज सोनवणे यांच्यासोबत प्रेमसंबंध होते. ज्योती हिने त्याच्यासोबत प्रेमाचे नाटक करत वेळोवेळी त्याचे आणि तिचे एकत्र असलेले फोटो आणि व्हिडिओ त्याच्या नात्यातील लोकांना पाठवण्याची धमकी देत आत्तापर्यंत तब्बल पाच लाख रुपये त्याच्याकडून उकळले होते आणि सोन्याचे दागिने देखील हस्तगत केलेले होते मात्र तरी देखील ती पैशाची मागणी करत होती.
14 मार्च रोजी युवराज याने ती राहत असलेल्या खडकी येथील इमारतीत सातव्या मजल्यावरील जिन्यात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. सदर प्रकरणी पोलीस तपास करत असून आरोपी ज्योती गिरी हिने असाच प्रकार इतर काही व्यक्तींच्या सोबत देखील केला आहे का याचा देखील पोलीस तपास करत आहेत.