आपले हित साधण्यासाठी कोण कधी कोणाचा कसा वापर करेल याचा काही नेम राहिलेला नाही . अशीच एक धक्कादायक घटना अमेरिकेत उघडकीस आली असून चक्क स्वतःच्या मुलाच्या अल्पवयीन मित्राशी लाडीगोडी करून त्याच्याशी शंभरवेळा शारीरिक संबंध ठेवल्याप्रकरणी अमेरिकेतील एका शिक्षिकेला सहा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सदर शिक्षिकेला २०२० मध्ये फ्लोरिडात अटक करण्यात आली होती.
उपलब्ध माहितीनुसार , सदर शिक्षिकेने हायस्कूलमध्ये शिकत असलेल्या या विद्यार्थ्याशी वर्षभर शारीरिक संबंध ठेवले. पीडित विद्यार्थ्याचे वय १५ वर्षे आहे असे या महिलेचे म्हणणे होते मात्र कोर्टाने त्याचे वय १२ वर्षापेक्षा जास्त आणि १६ वर्षांपेक्षा कमी असल्याचे मानले. कोर्टाच्या दस्तावेजात म्हटले आहे की, आरोपी शिक्षिकेची लैंगिक गुन्हेगार म्हणून नोंद केली जाईल आणि तुरुंगवासानंतर तिला वेगळी शिक्षा दिली जाईल.
प्रसार माध्यमात आलेल्या वृत्तानुसार , सदर शिक्षिका ही या विद्यार्थ्यांशी घरी, कार आणि चौपाटीवर शारीरिक संबंध ठेवायची. सदर अल्पवयीन मुलाने देखील आपल्यासोबत असा प्रकार या शिक्षिकेने केले असल्याचे म्हटले आहे तर मुलाच्या म्हणण्यानुसार त्याचे वय १५ वर्षे आणि महिलेचे वय ३९ वर्षे असल्यापासून दोघांनी संबंध ठेवले.
यादरम्यान शिक्षिकेने त्याला मुलाला आयफोनसह किमती चीजवस्तू भेट दिल्या त्यामुळे हा मुलगा देखील काळ खुश होता मात्र त्यानंतर त्याला हे चुकीचे असल्याची जाणीव झाली आणि या शिक्षिकेचा भांडाफोड झाला. सदर महिला ही शिक्षण तज्ज्ञ होती मात्र तिने आता या पदाचा राजीनामा दिलेला आहे .