विवाहीत मावशी पुन्हा लग्नाला बसलीय अडून , नात्याने प्रियकर चक्क तिचा ..

Spread the love

देशात एक अजब प्रकरण समोर आलेले असून बिहारच्या मुजफ्फरपुर येथे एक दोन मुलांची आई असलेली मावशी चक्क तिच्या बहिणीच्या मोठ्या मुलाच्या प्रेमात अखंड बुडालेली आहे. मुलाच्या आईचे यामुळे धाबे दणाणलेले असून सदर मावशी ही आता या मुलासोबतच विवाह करण्यासाठी अडून बसलेली आहे.

एका घरगुती कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ही महिला कटरा येथील तिच्या मोठ्या बहिणीच्या घरी गेलेली होती यावेळी बहिणीच्या मोठ्या मुलासोबत तिने बोलायला सुरू केले. नात्याने मावशी असल्याकारणाने त्यांच्या बोलण्यावर कुणाला शंका आली नाही मात्र त्यानंतर उत्तर प्रदेशात काही दिवस ते दोघे फिरून देखील आले त्यामुळे मात्र अनेक जणांना शंका येऊ लागली. तरुणाच्या आईने त्याला विचारल्यानंतर या तरुणाने मी मावशीसोबत लग्न करणार आहे असे सांगितल्यानंतर आईच्या पायाखालील वाळूची सरकली.

‘ मावशी ही विवाहित असून तिला दोन मुले आहेत आणि नात्याने ती देखील तुझ्या आईसारखीच आहे ‘ असे समजावण्याचा प्रयत्न या तरुणाच्या आईने त्याला केला मात्र त्याच्या डोक्यात काही प्रकाश पडला नाही. कौटुंबिक स्तरावर समजावल्यानंतर सामाजिक स्तरावर देखील हा विषय गेला आणि मावशी देखील त्याच्यासोबतच लग्न करण्यावर अडून बसलेली आहे. मावशीच्या नवऱ्याला सध्या घराबाहेर पडायची सोय राहिलेली नाही त्यानंतर प्रकरण पोलीस ठाण्यात गेल्यानंतर या मावशीने तिच्या पतीला ओळखण्यास देखील नकार दिलेला असून भाच्याशीच लग्न करण्याविषयी ती ठाम आहे अन्यथा आपण काही जीवाचे बरे वाईट करून घेऊ अशी देखील धमकी तिने दिलेली आहे.


Spread the love